नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी सर्वात मोठ्या राईट इश्यूतून मिळणाऱ्या रकमेतील काही हिस्सा हा कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. याचा उल्लेख राईट इश्यूच्या कागदपत्रात करण्यात आला आहे.
रिलायन्सला राईट इश्यूमधून ५३,०३६.१३ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. हा इश्यू २० मे रोजी खुला झाला आहे. त्याची ३ जून ही मुदत आहे. राईट इश्यू प्रत्येक समभागधारकाला १५ शेअरच्या बदल्यात एक अशा प्रमाणात दिला जाणार आहे. राइट इश्यूसाठी समभागधारकाला प्रति शेअर ३१४.२५ रुपये द्यावे लागणार आहेत. तर उर्वरित ९४२.७५ रुपये दोन हप्त्यात द्यावे लागणार आहेत.
हेही वाचा-एमएसएमई उद्योगांना ३ लाख कोटी रुपयांचे आपत्कालीन कर्ज; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजने काढलेल्या राईट्स इन्टायलेमेंटची (आरआयएल-आरई) किंमत आज निफ्टीत ३९.६ टक्क्यांनी वधारले. दिवसअखेर या शेअरची किंमत २१२ रुपये झाली आहे.
हेही वाचा-एपीएमसी आत्मनिर्भर भारताला उद्ध्वस्त करतेय?
काय आहे राईट्स इश्यू?
राईट्श इश्यू हे फक्त समभागधारकांनाच खरेदी करता येतात. त्यासाठी कंपनीकडून या शेअरमध्ये विशेष सवलत देण्यात येते. कंपन्यांकडून राईट्स इश्यूचा वापर भांडवल वाढविण्यासाठी करण्यात येतो.