नवी दिल्ली - पेट्रोलच्या दरवाढीचे सत्र सुरुच आहे. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलचे दर पुन्हा वाढले आहेत. तर डिझेलच्या किमती 30 जुलैनंतर आजही स्थिर राहिल्या आहेत.
सरकारी खनिज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलचे दर दिल्लीत प्रति लिटर 10 पैशांनी वाढविले आहेत. तर मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोलचे दर 9 पैशांनी वाढविले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा दर प्रति बॅरलचा दर हा 46 डॉलर आहे.
इंडियन ऑईल वेबसाईटच्या आकडेवारीनुसार दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 81.83 रुपये, कोलकात्यात 83.33 रुपये, मुंबईत 88.48 रुपये तर चेन्नईत 84.82 रुपये आहे. डिझेलच्या किमती दिल्लीत प्रति लिटर 73.56 रुपये, कोलकात्यात 77.06 रुपये, मुंबईत 80.11 आणि चेन्नईत 78.86 रुपये आहे.
दरम्यान, सरकारी तेल विपणन कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या दराचा आढावा घेण्यात येतो. त्याप्रमाणे देशातील पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ विक्रीचे दर बदलण्यात येतात.