ETV Bharat / business

पेट्रोल मुंबईत प्रति लिटर ९२ रुपयांच्या घरात; सामान्यांच्या खिशाला झळ

पेट्रोल व डिझेलच्या किमती प्रति लिटर २५ पैशांनी वाढल्या आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८५.२० रुपये आणि मुंबईत ९१.८० रुपये आहेत.

पेट्रोल दर न्यूज
पेट्रोल दर न्यूज
author img

By

Published : Jan 19, 2021, 3:44 PM IST

Updated : Jan 19, 2021, 4:15 PM IST

नवी दिल्ली - देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. पेट्रोलच्या किमतीने नवी दिल्लीत प्रति लिटर ८५ रुपयांनी टप्पा ओलांडला आहे. डिझेलच्या किमतीनेही नवी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी उच्चांक गाठला आहे.

पेट्रोल व डिझेलच्या किमती प्रति लिटर २५ पैशांनी वाढल्या आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८५.२० रुपये आणि मुंबईत ९१.८० रुपये आहेत. डिझेलच्या किमती दिल्लीत प्रति लिटर ७५.३८ रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोलच्या किमती ८२.१३ रुपये आहेत. पेट्रोलच्या किमतीही मुंबईत नव्या उच्चांकावर पोहोचत आहेत.

हेही वाचा-विशेष : RBI चे महाराष्ट्रातील अनेक बँका व पतसंस्थांवर आर्थिक निर्बंध, त्यात वसंतदादा बँकेची भर

सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने ६ जानेवारीपासून इंधनाचे दर वाढविण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी महिनाभर इंधनाचे दर स्थिर राहिले होते. कोरोनाच्या लसीकरणाची मोहिम भारतासह विविध देशांत सुरू आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सकारात्मक स्थिती असल्याने कच्च्या तेलाची मागणी वाढत आहे.

हेही वाचा-ठरलं! टेस्लाचे बंगळुरूमध्ये सुरू होणार कार्यालय

रोज किमतीचा घेतला जातो आढावा-

सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा रोज आढावा घेतला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि विदेश विनिमय दर यावरून देशातील पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित केले जातात. विविध राज्यांतील स्थानिक करांनुसार पेट्रोल-डिझेलचे दर भिन्न असतात.

Last Updated : Jan 19, 2021, 4:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.