मुंबई - सप्ताहाची सुरुवात मुंबई शेअर बाजारात सकारात्मक वातावरणाने झाली आहे. मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ५६१.३६ अंशांनी वधारून ३१,८८८.५८ अंशांवर पोहोचला.
निफ्टीचा निर्देशांक १५०.५० अंशांनी वधारून ९,३१०.०५ वर पोहोचला. दरम्यान, मागील सत्रात आयटी आणि वित्तीय संस्थांच्या शेअरवर विक्रीचा दबाव दिसून आला.
हेही वाचा-कोरोना लढा : अतिश्रीमंतावर ४० टक्के कर लागू करा, महसूल अधिकाऱ्यांची सरकारला शिफारस
शेअर बाजार ५३५.८६ अंशांनी घसरून ३१,३२७.२२ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १५९.५० अंशांनी घसरून ९,१५४.४० वर स्थिरावला.
हेही वाचा-केंद्र सरकारच्या आदेशाला हरताळ; विमान कंपन्यांकडून तिकीट बुकिंग सुरू