ETV Bharat / business

सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा ओढा

author img

By

Published : Oct 11, 2020, 6:15 PM IST

सध्या दसरा-दिवाळी तोंडावर असून 'अनलॉक' प्रक्रियेमुळे हे सण आता जोरात साजरे होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची तयारी बाजारांमध्ये सुरू आहे. त्यातच सध्या हाती आलेल्या एका सर्वेक्षणातून ऑनलाइन खरेदी 51 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली
नवी दिल्ली

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार आणि लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सण-उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. आता दसरा-दिवाळी तोंडावर असून 'अनलॉक' प्रक्रियेमुळे हे सण आता जोरात साजरे होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची तयारी बाजारांमध्ये सुरू आहे. त्यातच सध्या हाती आलेल्या एका सर्वेक्षणातून ऑनलाइन खरेदी 51 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे समोर आले आहे.

2019 मध्ये स्थानिक पातळीवर केवळ 27 टक्के ग्राहकांनी ऑनलाइन खरेदीला प्रथम प्राधान्य दिले होते. मात्र, यावेळची परिस्थिती वेगळी आहे. वर्ष २०२० मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे की, 51 टक्के लोक ऑनलाइन खरेदीला पसंती देत असून त्यासाठी ई-कॉमर्स संकेतस्थळे, विविध अनुप्रयोगांचा (अ‌ॅप्स) उपयोग करत आहेत.

छोट्या, मध्यम आणि कुटीर उद्योगांकडून खरेदी करण्याविषयी 80 टक्के लोकांनी ऑनलाइनवर सहमती दर्शविली आहे. 10 टक्के लोकांनी सर्वेक्षणात ऑफलाइन खरेदीला प्राधान्य असल्याचे सांगितले. तर 10 टक्के लोकांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या सर्वेक्षणासाठी भारतातील 330 हून अधिक जिल्ह्यांमधील जवळपास तीन लाख लोकांनी आपली प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा - भारतात ओएलएक्सने दिला २५० कर्मचाऱ्यांना नारळ, कारण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.