ETV Bharat / business

दिलासादायक! खाद्यतेलाच्या घाऊक दरात प्रति लिटर 4 ते 7 रुपयांची कपात - अदानी विलमार

उद्योगाकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे एसईएचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी म्हटले. जगभरातील खाद्यतेलाचा पुरवठा सुधारत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहेत, असे चतुर्वेदी यांनी म्हटले. लग्नसराई समारंभ संपल्यानंतही देशातील खाद्यतेलाच्या कमी होणार आहेत.

खाद्यतेल दर
खाद्यतेल दर
author img

By

Published : Nov 3, 2021, 6:06 PM IST

नवी दिल्ली - ऐन दिवाळीत खाद्यतेलाचे दर वाढल्याने होणाऱ्या आर्थिक झळीतून ग्राहकांची काही प्रमाणात सुटका होणार आहे. अदानी विलमार, रुची सोया इंडस्ट्रीजसह विविध खाद्यतेल कंपन्यांनी प्रति लिटर 4 ते 7 रुपये कपात केली आहे. या मोठ्या कंपन्यांनी खाद्यतेलाचे दर कमी केल्यानंतर इतर कंपन्यांकडून खाद्यतेलाच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.

मोठ्या खाद्यतेल कंपन्यांबरोबर जेमिनी इडिबल, फॅट्स इंडिया, मोदी नॅचरल, गोकुळ रिफॉईल, सॉल्वहंट, विजय सॉल्वेक्स, गोकुळ अॅग्रो रिसोर्से आणि एन. के प्रोटिन्स कंपनीही खाद्यतेलाच्या दरात कपात केली आहे. सॉल्वहंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ही (एसईए) खाद्यतेल कंपन्यांची संस्था आहे. या संस्थेने खाद्यतेल कंपन्यांना दर कमी करण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा-गोव्यात नाराजांची बंडाळी भाजपला भोवणार.. आप अन् तृणमूलच्या प्रवेशाने गोव्याच्या राजकारणात रंगत

उद्योगाकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे एसईएचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी म्हटले. जगभरातील खाद्यतेलाचा पुरवठा सुधारत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहेत, असे चतुर्वेदी यांनी म्हटले. लग्नसराई समारंभ संपल्यानंतही देशातील खाद्यतेलाच्या कमी होणार आहेत.

हेही वाचा-अयोध्येत प्रज्वलित होणार 7 लाख 50 हजार पणत्या; विश्वविक्रम होण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर वाढल्यानंतर देशातील खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. देशात लागणाऱ्या खाद्यतेलाच्या 60 टक्के खाद्यतेल हे आयात केले जाते. त्यामुळे आयात केलेल्या खाद्यतेलाचे दरही जास्त असतात.

हेही वाचा-विशेष : कर्नाटकातील दिवाळी कशी असते, सांगतायेत पूर्णब्रह्मच्या प्रमुख जयंती कठाळे

सप्टेंबर महिन्यात आयात शुल्कात कपात -

11 सप्टेंबर रोजी पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क कमी करण्यात आले होते. तर कच्च्या पाम तेलावरील मूलभूत आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आले. त्याचबरोबर कच्च्या सोया तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कही 7.5 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.