नवी दिल्ली - शेअर बाजार गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज २ लाख ८३ हजार ७४०.३१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या उपाय योजनांची घोषणा केली. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक वधारला आहे.
मुंबई शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ९८६.११ अंशांनी वधारून ३१,५८८.७१ वर स्थिरावला. त्यानंतर मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली बाजार मूल्य हे वाढले आहे.
हेही वाचा-खूशखबर! कोरोनाच्या संकटातही 'ही' कंपनी १,५०० जणांना देणार नोकऱ्या
या कंपन्यांचे असे वधारले आहेत शेअर
- अॅक्सिस बँक - १३.४५ टक्के
- आयसीआयसीआय बँक -९.८९ टक्के
- इंडसइंड बँक - ९.१३ टक्के
- टीसीएस -५.३२ टक्के
- कोटक बँक - ४.९६ टक्के
- रिलायन्स इंडस्ट्रीज - ४.८२ टक्के
रिलीगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (संशोधन) अजित मिश्रा म्हणाले, भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनाची तरलता आणि वित्तीय स्थिरतेसाठी बळकट उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे भांडवली बाजारात आणि अर्थव्यवस्थेमध्ये मोठी सकारात्मकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा-शेतमालाची वाहतूक करण्यारकरता कृषी मंत्रालयाने सुरू केले खास अॅप