नवी दिल्ली - सर्वसामान्यांना नोव्हेंबरमध्ये किरकोळ बाजारपेठेतील महागाईपाठोपाठ घाऊक बाजारपेठेतील महागाईला तोंड द्यावे लागले. हे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. वार्षिक महागाई दराच्या तुलनेत घाऊक बाजारपेठेतील महागाई नोव्हेंबरमध्ये ०.५८ टक्क्यांनी वाढली.
गतवर्षी घाऊक बाजारपेठेतील महागाई (व्होलसेल प्राईस इन्डेक्स) नोव्हेंबरमध्ये ४.३७ टक्के होती. तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाई ही ०.१६ टक्के राहिली आहे. घाऊक बाजारपेठेतील किंमत निर्देशांकातून घाऊक बाजारपेठेत वस्तुंचे दर किती वाढले, याचे आकलन होते. ही माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध केली जाते.
हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेत महागाईचा ३ वर्षातील उच्चांक; नोव्हेंबरमध्ये ५.५४ टक्के नोंद
नोव्हेंबरमध्ये किरकोळ बाजारपेठेत महागाईचा ३ वर्षातील उच्चांक
सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या महागाईने नोव्हेंबरमध्ये उच्चांक गाठल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. किरकोळ बाजारपेठेतील महागाईची नोव्हेंबरमध्ये ५.५४ टक्के नोंद झाली आहे. किरकोळ बाजारपेठेतील ही महागाई गेल्या ३ वर्षातील सर्वाधिक आहे.