ETV Bharat / business

चालू वर्षात एप्रिल ते जून तिमाहीत सोन्याच्या आयातीत 76 टनची वाढ - gold demand during pandemic

Gold Demand Trends Q2 2021 हा सोन्याच्या मागणीबाबत माहिती देणारा अहवाल जागतिक सुवर्ण परिषेदेने जाहीर केला. या अहवालामध्ये चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची आयात वाढून 63.8 टन झाल्याचे नमूद केले आहे.

सोने आयात
सोने आयात
author img

By

Published : Jul 29, 2021, 8:47 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटातही देशातील सोन्याची मागणी वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. चालू वर्षाच्या एप्रिल ते जून महिन्याच्या तिमाहीत सोन्याची आयात 19.2 टक्क्यांनी वाढून 76.1 टन आहे. गतवर्षी टाळेबंदीमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे जागतिक सुवर्ण परिषदने (world gold council) म्हटले आहे.

Gold Demand Trends Q2 2021 हा सोन्याच्या मागणीबाबत माहिती देणारा अहवाल जागतिक सुवर्ण परिषेदेने जाहीर केला. या अहवालामध्ये चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची आयात वाढून 63.8 टन झाल्याचे नमूद केले आहे.

हेही वाचा-दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत पालकांवरच उपस्थित केले प्रश्न

  • जागतिक सुवर्ण परिषदेचे प्रादेशिक सीईओ सोमसुंदरम पी. आर. म्हणाले, की एप्रिल ते जूनच्या तिमाहीत सोन्याची मागणी 23 टक्क्यांनी वाढून 32,810 कोटी रुपये आहे.
  • 2020 च्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते जूनच्या तिमाहीत सोन्याची मागणी ही 26,600 कोटी रुपये होती.
  • असे असले तरी कोरोनोच्या दुसऱ्या लाटेत तिमाहीदरम्यान सोन्याची मागणी ही 46 टक्क्यांनी कमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • 2020 मध्ये पहिल्या सहामाहीत 157.6 टन सोन्याची मागणी होती. हे प्रमाण 2019 च्या पहिल्या सहामाहीत सोन्याची मागणी 46 टक्क्यांहून कमी होती.
  • तर 2015 ते 2019 मधील पहिल्या सहामाहीच्या तुलनेत 39 टक्क्यांनी कमी मागणी होती.
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक भागांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे अनेक व्यवसायांवर परिणाम झाला होता.
  • ग्राहकांचा विश्वास आणि व्यवसायाला मिळणारा प्रतिसाद हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर अवलंबून असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेचे प्रादेशिक सीईओ सोमसुंदरम पी. आर. यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा-Kerala Lockdown : केरळमध्ये विकेंड लॉकडाऊन कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.