हाँगकाँग - हाँगकाँग शेअर बाजाराने (एचकेईएक्स) लंडन शेअर बाजार (एलएसईजी) खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी ३६.६ अब्ज डॉलरला देण्याची हाँगकाँग शेअर बाजाराने ऑफर दिली आहे. हाँगकाँग शेअर बाजार हा आशिया खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचा शेअर बाजार आहे.
दोन शेअर बाजार एकत्र आल्याने दोन्ही संस्थांचे व्यवसाय बळकट होणार आहेत. त्यामधून बाजार आणि भौगोलिक क्षेत्रात अधिक व्यवसाय विकसित करण्यात येवू शकेल. तसेच बाजारात सहभागी होणारे व गुंतवणूकदारांना जागतिक बाजारपेठेशी जोडणे शक्य होईल, असे हाँगकाँग शेअर बाजाराने म्हटले आहे. यापूर्वी हाँगकाँग शेअर बाजाराने लंडन धातू बाजार २०१२ मध्ये ताब्यात घेतला आहे.
हेही वाचा-वाहनांवरील जीएसटी कमी करण्याबाबत वित्तीय मंत्रालयाची राज्य सरकारांबरोबर चर्चा सुरू
लंडन शेअर बाजाराने ही दिली प्रतिक्रिया-
दोन्ही शेअर बाजार चांगले ब्रँड आहेत. तसेच वित्तीय बळकट आणि चांगली प्रगती नोंदविली आहे. दोन्ही शेअर बाजार एकत्र आल्याने पश्चिम आणि पूर्व एकत्र येणार आहे. हाँगकाँग शेअर बाजाराची ऑफर ही अनेपेक्षित, प्राथमिक आणि खूप अटी असलेली असल्याची प्रतिक्रिया लंडन शेअर बाजाराने दिली आहे. संचालक मंडळ प्रस्तावावर चर्चा करून निर्णय जाहीर करणार असल्याचेही लंडन शेअर बाजाराने म्हटले आहे.
हेही वाचा-टाटा मोटर्सला विदेशातील व्यवसायातही फटका, वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये ३२ टक्क्यांची घट