नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून सुवर्ण रोख्यांच्या खरेदीवर प्रति ग्रॅम ५० रुपये सवलत दिली जाणार आहे. मात्र, ही सवलत केवळ ऑनलाईन आणि डिजीटल माध्यमातून करणाऱ्या ग्राहकांना देण्यात येणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने सुवर्ण रोख्यांवरील सवलतीची माहिती जाहीर केली आहे. डिजीटल माध्यमातून खरेदी करण्याकरता सुवर्णरोख्यावरील प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ५,०५४ रुपये आहे. तर इतर माध्यमातून सुवर्ण रोखे खरेदी केल्यास प्रति ग्रॅमची किंमत ५,१०४ रुपये असणार आहे.
हेही वाचा-डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई होण्याची शक्यता
सुवर्ण रोख्याची ही असणार आहे मुदत
सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार सार्वभौम सुवर्ण रोखे २०२०-२१ (श्रेणी १०) करिता अटी लागू असणार आहेत. हे सुवर्णरोखे ११ जानेवारी ते १५ जानेवारी २०२१ मध्ये खुले असणार आहेत. तर १९ जानेवारी २०२१ हे सेटलमेंटची तारीख असणार आहे.
हेही वाचा-स्टेट बँकेकडून गृहखरेदी करणाऱ्यांना दिलासा; व्याज दरात कपात
यामुळे सरकारने सुरू केले होते सुवर्ण रोखे-
भारतीयांचा सोने खरेदीकडे असलेला कल लक्षात घेवून मोदी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेला २०१५ मध्ये सुरुवात केली होती. योजनेसाठी फक्त भारतीय नागरिक, धर्मादाय संस्था, कंपन्या, ट्रस्ट आदी अर्ज करू शकतात. एक ग्रॅम सोन्यासाठी एक रोख्यात गुंतवणूक करण्यात येते. भौतिक सोन्याची कमी मागणी होण्यासाठी सरकारकडून सुवर्ण रोखे बाजारात आणण्यात आले आहेत.