नवी दिल्ली - केंद्र सरकारने आयआरटीसीमधील २.४० कोटी शेअर अथवा १५ टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. जर गुंतवणुकदारांनी जास्त प्रतिसाद दिला तर ५ टक्के अधिक शेअर विकण्याचा प्रस्तावात समावेश आहे.
आयआरसीटीसीच्या एका शेअरची किंमत १,३६७ रुपये निश्चित केली आहे. शेअर बाजारात आयआरसीटीच्या शेअरची विक्री करण्यासाठी १० डिसेंबर आणि ११ डिसेंबरला स्वतंत्र खिडकी सुरू करण्यात येणार आहे. केवळ किरकोळ गुंतवणुकदारांना ११ डिसेंबरला शेअर खरेदी करण्याची परवानगी मिळणार आहे.
हेही वाचा-बायबॅक: टीसीएस १८ डिसेंबरपासून १६ हजार कोटींचे शेअर घेणार परत
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (डीआयपीएएम) विभागाच्या अधिकृत ट्विटरवर आयआरसीटीच्या शेअर विक्रीबाबात माहिती दिली आहे. केंद्र सरकार आयआरसीटीमध्ये १५ टक्के निर्गुंतवणूक करणार असल्याचे ट्विटमध्ये नमूद केले आहे.
हेही वाचा-बँकांची आरटीजीएस सेवा १४ डिसेंबरपासून २४X७
आयआरसीटीसीचे पहिल्यांदा ऑक्टोबर २०१९ मध्ये शेअर उपलब्ध
आयआरसीटीसी ही रेल्वेची ऑनलाईन तिकिटे, पर्यटन आणि खानपानाची सुविधा देणारी कंपनी आहे. या कंपनीचे शेअर पहिल्यांदा १४ ऑक्टोबर २०१९ मध्ये गुंतवणूकदारांना उपलब्ध झाले. या दिवशी मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध होताना आयआरसीटीसीच्या शेअरची किंमत १०१ पटीने वाढली होती.