ETV Bharat / business

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; चांदीच्या दरात घसरण - सोने दर न्यूज

सोन्याच्या दरात काही दिवस घसरण झाल्यानंतर पुन्हा दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोमेक्समध्ये (न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज) सोन्याचे दर वाढल्याने देशातही सोन्याचे दर वाढत आहेत.

gold rate
सोने दर न्यूज
author img

By

Published : Jul 2, 2021, 5:31 PM IST

Updated : Jul 2, 2021, 8:01 PM IST

नवी दिल्ली - सोन्याचे दर वाढल्यानंतर चांदीच्या दरात नेहमीच वाढ होते. मात्र, दिल्लीत आज सोन्याचे दर वाढूनही चांदीचे दर घसरले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सोन्याचे दर वाढले आहेत.

दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा २५१ रुपयांनी वाढून ४६,६१५ रुपये आहे. मागील बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,३६४ रुपये होता. चांदीचे दर प्रति किलो २५६ रुपयांनी घसरून ६८,४५८ रुपये आहे. मागील बाजारात चांदीचा दर प्रति किलो ६८,७१४ रुपये होता.

हेही वाचा-पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरुच; मुंबईत पेट्रोल 105 पार, इतर शहरात काय स्थिती?

या कारणांनी सोन्याचे वाढले दर-

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की कोमेक्समध्ये (न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज) सोन्याचे दर वाढल्याने दिल्लीतही सोन्याचे दर वाढले आहेत. बाजार खुला होताना रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत २० पैशांनी घसरून ७४.७५ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारून प्रति औंस १,७७८ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २६.०३ डॉलर आहेत.

हेही वाचा-व्हॉट्सअपचे येतयं नवं फीचर; मेसेज एकदाच दिसणार, पुन्हा होणार अदृश्य

  • सोमवारी असे होते सोने-चांदीचे दर

सोन्याचे दिल्लीत सोन्याचे दर प्रति तोळा ११६ रुपयांनी वाढून ४६,३३७ रुपये होते. तर त्यामागील मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,२२१ रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीचे दर सोमवारी वधारले होते. चांदीचे दर प्रति किलो १६१ रुपयांनी वाढून सोमारी ६६,८५४ रुपये होते.

  • मंगळवारी असे होते सोने-चांदीचे दर

सोन्याचे दर मंगळवारी दिल्लीत प्रति तोळा ९९ रुपयांनी कमी होऊन ४६,१६७ रुपये राहिले होते. चांदीचे दर प्रति किलो २२२ रुपयांनी घसरून ६७,९२६ रुपये राहिले होते.

  • बुधवारी असे होते सोने-चांदीचे दर

सोन्याच्या दरात दिल्लीत प्रति तोळा २६४ रुपयांची घसरण झाली होती. या घसरणीनंतर दिल्लीत सोने प्रति तोळा ४५,७८३ रुपये होते. चांदीचे दर प्रति किलो ६० रुपयांनी घसरून ६७,४७२ रुपये होते. गेल्या दोन महिन्यांत सोन्याचा दर गुरुवारी सर्वात कमी होता. डॉलरचे मूल्य वाढत असल्याने सोन्याचे दर घसरले होते.

  • गुरुवारी असे होते सोने-चांदीचे दर

सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ५२६ रुपयांनी वाढून ४६,३१० रुपये झाले होते. तर चांदीचे दर प्रति किलो १,२३१ रुपयांनी वधारून ६८,६५४ रुपये झाले होते.

हेही वाचा-केंद्राकडून पामतेलावरील आयात शुल्कात कपात; लवकरच खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता

Last Updated : Jul 2, 2021, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.