नवी दिल्ली - सोन्याच्या दरात अंशत: घट झाली आहे. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत वधारल्याने सोन्याच्या दरात घट झाल्याचे एचडीएफसी बँकेने म्हटले आहे.
सोन्याच्या दरात प्रति तोळा १६ रुपयांनी घट होऊन ४९,४८४ रुपये दर आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४९,५०० रुपये होता. चांदीचा दर प्रति किलो २०५ रुपयांनी वधारून ६७,६७३ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६७,४६८ रुपये होता.
हेही वाचा-नवीन वर्षात स्कोडाच्याही किमती वाढण्याची शक्यता
रुपयाचे मूल्य वधारल्याने सोन्याच्या किमतीत घसरण-
एक रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ९ पैशांनी वधारून ७३.३३ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अंशत: वाढले आहेत. चांदीचे दर स्थिर राहिले आहेत. सोन्याच्या किमती मंगळवारी डॉलर निर्देशांक घसरल्यानंतर आज वाढल्या आहेत. कोरोना महामारीच्या भीतीमुळे अर्थव्यवस्था सावरण्याबाबत भीती व्यक्त होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-एलआयसीकडून २ टक्के हिश्श्याची आयसीआयसीआय बँकेला विक्री
सोने व चांदीच्या भावात चढ-उतार सुरू
गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत जाऊन सोने ५८ हजारांपर्यंत गेले होते. तसेच चांदीदेखील ७७ हजारांच्या पुढे गेली होती. मात्र, नंतर बाजारपेठ खुली होत गेली तसतसे सोने-चांदीचे भाव कमी-कमी होत गेले. विशेष म्हणजे, विजयादशमी व धनत्रयोदशीलादेखील सोने-चांदीचे भाव आणखी कमी झाले होते.