मुंबई - सोन्याचा दर मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) प्रति तोळा ४६,७८५ रुपये झाले आहेत. हा आजपर्यंत सोन्याचा सर्वोच्च दर आहे. कोरोनाने संकट निर्माण झाल्याने जागतिक वित्तीय बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
अँजेल ब्रोकिंगचे अनुज गुप्ता म्हणाले, सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. टाळांबदी (लॉकडाऊन) वाढल्याने गुंतवणूक करण्यासाठी सोन्याची मागणी वाढली आहे. कमी झालेले व्याजदर आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरेल, असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या संकटात इंग्लंडला भारताने 'अशी' केली मदत
सोने एमसीएक्समध्ये प्रति तोळा ४९ हजार ते ५० हजार रुपयांवर पोहोचेल, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली. स्पॉट सोन्याचा व्यापार देशात बंद आहे. मात्र, गुंतवणूक सोने खरेदी अधिक करतील, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.
हेही वाचा-रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम परत करण्यास विमान कंपन्यांचा नकार!