ETV Bharat / business

सलग पाच दिवसांच्या घसरणीला ब्रेक; सोन प्रति तोळा ९४ रुपयांनी महाग - gold rate news

चांदीचे दर प्रति किलो ३४० रुपयांनी वधारून ६८,३९१ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ४६,७८३ रुपये किलो होता.

सोने किंमत न्यूज
सोने किंमत न्यूज
author img

By

Published : Feb 8, 2021, 4:23 PM IST

नवी दिल्ली - गेली पाच दिवस सोन्याच्या किमतीमधील घसरणीला आज ब्रेक लागला आहे. सोने प्रति तोळा ९४ रुपयांनी वाढून ४६,८७७ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीमुळे देशात सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

मागील सत्रात सोन्याचे दर प्रति तोळा ४६,७८३ रुपये होते. सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही वधारले आहेत. चांदीचे दर प्रति किलो ३४० रुपयांनी वधारून ६८,३९१ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ४६,७८३ रुपये किलो होता.

हेही वाचा-लग्नसराईतही सोन्याची चमक फिक्की; आठवडाभरात किमतीत दीड हजारांची घसरण

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले की, अमेरिकेतील वेतनाच्या आकडेवारी निराशाजनक असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.

हेही वाचा-सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटीज रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले की, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील नोकऱ्यांबाबत चिंताजनक स्थिती आहे. डॉलरच्या किमतीवर दबाव आहे. अशा स्थितीत सोन्याचे दर वाडले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.