नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा (१० ग्रॅम) १४८ रुपयांनी घसरून ४६,३०७ रुपये आहे. जागतिक बाजारात सोन्याची झालेली विक्री आणि रुपयांची घसरण या कारणांनी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे एचडीएफसीने म्हटले आहे.
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो ८८६ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो ६८,६७६ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६९,५६२ रुपये होता.
हेही वाचा-क्रिप्टोचलनाने आर्थिक स्थिरतेवर होणार परिणाम; आरबीआयकडून चिंता व्यक्त
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले की, दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळो १४८ रुपयांची घसरण झाली आहे. रुपयाचे मूल्य हे डॉलरच्या तुलनेत सुमारे १२ पैशांनी वधारले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस १,८०७ डॉलर राहिले आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २७.६३ डॉलर राहिले आहेत.
हेही वाचा-ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांची बिटकॉईनमध्ये १७० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक