नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ५३४ रुपयांनी घसरून ४८,६५२ रुपये आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर घसरल्याने हा परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचे दर प्रति तोळा ४९,१८६ रुपये होते. चांदीचे दर प्रति किलो ६२८ रुपयांनी घसरून ६३,३३९ रुपये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले, की सलग चौथ्या दरात डॉलर बळकट झाला आहे. अमेरिकेचे वित्तीय पॅकेज लांबणीवर गेल्याने सोन्याचे दर घसरले आहेत.
हेही वाचा-मोटोरोलाचा मोटो जी 9 स्मार्टफोन भारतीय बाजारात, किंमत 11,999 रुपये
आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा सोन्यासह चांदीच्या किमतीवर परिणाम-
सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करतात. त्यानंतर सोने आणि चांदी खरेदी व विक्रीला प्राधान्य देत आहेत. दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय बाजाराचा कल बदलत आहे. त्यामुळे सोने व चांदीचे दर अस्थिर आहेत.