नवी दिल्ली - सोन्याच्या दरात नवी दिल्लीत प्रति तोळा ४६४ रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर दिल्लीत सोने प्रति तोळा ४७,७०५ रुपये आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४८,१६९ रुपये होता.
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचे दर प्रति किलो ७२३ रुपयांनी घसरून ७०,४२० रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचे दर प्रति किलो ७१,१४३ रुपये होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस १,८५८ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २७.७० डॉलर आहेत.
हेही वाचा-कच्च्या मालाच्या पुरवठ्याकरिता सरकारने हस्तक्षेप करावा-ऑक्सिजन कंपनीची मागणी
काय आहे तज्ज्ञांचे मत?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की डॉलरचे मूल्य बळकट झाल्याने सोन्याचे दर घसरले आहेत. ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार हे अमेरिकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले, की गेल्या आठवडभरात सोन्याच्या किमतीने नीचांक गाठला आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या संकटात भडका! घाऊक बाजारपेठेत मे महिन्यात १२.९४ टक्के महागाई
दुबईतून केरळमार्गे 100 किलो सोन्याची तस्करी सांगली जिल्ह्यात!
दुबईतून केरळमार्गे १०० किलो सोन्याची तस्करी सांगली जिल्ह्यात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एनआयएच्या पथकाकडून सांगली जिल्ह्यात छापे टाकण्यात आले आहेत. जुलै २०२० मध्ये केरळमध्ये सोने तस्करीचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर मुख्य सूत्रधाराला अटक केल्यानंतर ते १०० किलो सोने सांगली जिल्ह्यात पाठवल्याची माहिती आली आहे. त्यामुळे एनआयएचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे.