नवी दिल्ली - सोन्याच्या दरात प्रति तोळा (१० ग्रॅम) ३४२ रुपयांची घसरण होऊन ४५,५९९ रुपये दर आहे. चांदीच्या दरात प्रति किलो २,००७ रुपयांची घसरण होऊन ६७,४९९ रुपये दर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुंची विक्री होत असल्याने सोने-चांदीचे दर कमी होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४५,९४१ रुपये होता. सोन्याचा आज दर प्रति तोळा ४५,५९९ रुपये आहे. चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचे दर प्रति किलो २,००७ रुपयांनी घसरून ६७,४१९ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६९,४२६ रुपये होता.
हेही वाचा-अर्थव्यवस्थेचा विकास होताना उद्योगांसाठी वित्तपुरवठा वाढविण्याची गरज
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले की, दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस १,७६० डॉलर आहेत. तर चांदीचे दर घसरून प्रति औंस २६.७८ डॉलर आहेत.
हेही वाचा-कच्च्या तेलाच्या उत्पादक देशांनी किमती वाढविल्याने पेट्रोल-डिझेल महाग