नवी दिल्ली - सोन्याच्या दरात दिल्लीत प्रति तोळा 152 रुपयांची घसरण होऊन दर 48,107 रुपये आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याने हा परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 48,259 रुपये होता.
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो 540 रुपयांनी घसरून 69,925 रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 70,465 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 1,883 डॉलरने घसरला आहे. तर चांदीचे स्थिर राहून प्रति औंस 27.55 डॉलर आहे.
हेही वाचा-प्राप्तिकर विभागाची ई-फायलिंग वेबसाईट होणार आज लाँच; वाचा सविस्तर माहिती
डॉलरचे मूल्य बळकट झाल्याने सोन्याच्या किमती सोमवारी कमी झाल्याचे एचडीएसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा-टेस्लानंतर अमेरिकेची दुसरी इलेक्ट्रिक कंपनीही भारतात येणार- नितीन गडकरी
15 जूननंतर सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य -
केंद्र सरकारने 15 जून नंतर सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. केंद्राच्या या निर्णयाचं काही सराफा व्यापाऱ्यांनी स्वागत केलंय. दरम्यान, त्यांच्या काही मागण्यादेखील आहेत. कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे आधीचा स्टॉक विक्रीअभावी दुकानातच आहे. या मालाची विक्री करण्यासाठी सराफा व्यापारी सरकारकडून सहा महिन्यांची मुदतवाढ मागत आहेत.
हॉलमार्क म्हणजे काय?
हॉलमार्क म्हणजे कोणत्याही दागिन्यांची शुद्धता पारखल्यानंतर लावण्यात येणारे बीआयएस (BIS) लोगो. यावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते.
- हॉलमार्कवर BIS बीआयएसचा त्रिकोणी लोगो असतो.
- तसेच त्यावर हॉलमार्किंग केंद्राचाही लोगो असतो.
- त्यावर सोन्याची शुद्धता लिहीलेली असते.
- दागिने बनवल्याचे वर्ष लिहिले असते.
- ज्वेलरचा लोगो असतो.