ETV Bharat / business

शेअर बाजाराने मोडले सर्व विक्रम, सेन्सेक्स ऐतिहासिक उंचीवर

author img

By

Published : Oct 31, 2019, 12:02 PM IST

Updated : Oct 31, 2019, 3:28 PM IST

या आठवड्यात लागोपाठ तिसऱ्या सत्रात शेअर बाजार तेजीत चालत आहे. सेन्सेक्सने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत.

share market

मुंबई - सेन्सेक्स आज ऐतिहासिक उंचीवर जाऊन पोहोचला आहे. या आठवड्यात लागोपाठ तिसऱ्या सत्रात शेअर बाजार तेजीत चालत आहे. सेन्सेक्सने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. आज शेअर बाजार सुरू झाल्यानंतर २८० अंकाची वाढ होऊन सेन्सेक्स ४०.३३५.८६ पोहचला आहे.

सेन्सेक्स तब्बल २८० अंकांनी वाढून ४०,३३५.८५ वर पोहोचला. तर, निफ्टी ११,९२१.३० वर पोहोचला. गुंतवणूकदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने बाजारात आशादायी चित्र तयार झाले आहे.

Sensex rises over 280 points, to touch 40,335.85; Nifty at 11,921.30 pic.twitter.com/i20jqTzgml

— ANI (@ANI) October 31, 2019 ">

केंद्र सरकार लाभांश वितरण कर (डीडीटी), दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर (एलटीसीजी) आणि रोखे उलाढाल कर (एसटीटी) या गुंतवणूकदारांवर भार असलेल्या कर तरतुदी रद्दबातल करण्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. लवकरच या संबंधाने अधिकृतपणे घोषणा केली जाईल, अशी बाजारात आशा आहे. यापूर्वी कंपनी करात केंद्र सरकारने केलेल्या कपातीने बाजाराचा मूड पालटण्यात मोठे योगदान दिले आहे. यामुळे शेअर बाजार वधारला आहे.

मुंबई - सेन्सेक्स आज ऐतिहासिक उंचीवर जाऊन पोहोचला आहे. या आठवड्यात लागोपाठ तिसऱ्या सत्रात शेअर बाजार तेजीत चालत आहे. सेन्सेक्सने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. आज शेअर बाजार सुरू झाल्यानंतर २८० अंकाची वाढ होऊन सेन्सेक्स ४०.३३५.८६ पोहचला आहे.

सेन्सेक्स तब्बल २८० अंकांनी वाढून ४०,३३५.८५ वर पोहोचला. तर, निफ्टी ११,९२१.३० वर पोहोचला. गुंतवणूकदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने बाजारात आशादायी चित्र तयार झाले आहे.

केंद्र सरकार लाभांश वितरण कर (डीडीटी), दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर (एलटीसीजी) आणि रोखे उलाढाल कर (एसटीटी) या गुंतवणूकदारांवर भार असलेल्या कर तरतुदी रद्दबातल करण्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. लवकरच या संबंधाने अधिकृतपणे घोषणा केली जाईल, अशी बाजारात आशा आहे. यापूर्वी कंपनी करात केंद्र सरकारने केलेल्या कपातीने बाजाराचा मूड पालटण्यात मोठे योगदान दिले आहे. यामुळे शेअर बाजार वधारला आहे.

Intro:Body:

business share market sensex records all time high

business latest news, share market latest news, sensex records all time high, sensex latest update

-----------------

शेअर बाजाराने मोडले सर्व विक्रम, सेंसेक्स ऐतिहासिक उंचीवर

मुंबई - सेंसेक्स आज ऐतिहासिक उंचीवर जाऊन पोहोचला आहे. या आठवड्यात लागोपाठ तिसऱ्या सत्रात शेअर बाजार तेजीत चालत आहे. सेंसेक्सने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत.

-------------------

केंद्र सरकार लाभांश वितरण कर (डीडीटी), दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर (एलटीसीजी) आणि रोखे उलाढाल कर (एसटीटी) या गुंतवणूकदारांवर भार असलेल्या कर तरतुदी रद्दबातल करण्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. लवकरच या संबंधाने अधिकृतपणे घोषणा केली जाईल, अशी बाजारात आशा आहे. 

यापूर्वी कंपनी करात केंद्र सरकारने केलेल्या कपातीने बाजाराचा मूड पालटण्यात मोठे योगदान दिले आहे. या आशादायी वातावरणात, कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगले आलेले तिमाही निकाल आणि सकारात्मक आंतरराष्ट्रीय घडामोडींचीही भर पडत आहे. परिणामी बुधवारी बाजारातील व्यवहार आटोपले तेव्हा सेन्सेक्स २२०.०३ अंशांची कमाई करीत ४०,०५१.८७ या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला. बरोबरीने ५७.२५ अंशांची भर घालत निफ्टी निर्देशांकाने ११,८४४.१० ही पातळी गाठली. सेन्सेक्सने यापूर्वी ४ जून २०१९ रोजी ४०,००० पुढे कूच केली होती.

केंद्र सरकारकडून कर-कपातीच्या आणखी एका नजराण्याच्या अपेक्षेने उंचावलेल्या गुंतवणूकदारांच्या भावनांनी बुधवारी भांडवली बाजारात सलग चौथ्या व्यवहारात कमाल साधली. २२० अंशांच्या मुसंडीने सेन्सेक्सने चालू वर्षी जूनमध्ये गमावलेला ४०,००० अंशांचा महत्त्वपूर्ण टप्पा पुन्हा सर केला.

Conclusion:
Last Updated : Oct 31, 2019, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.