ETV Bharat / business

घाऊक बाजारपेठेतील महागाईचा निर्देशांक ऑगस्टमध्ये 'जैसे थे', १.०८ टक्क्यांची नोंद

किरकोळ बाजारपेठेतील महागाई भडकल्यानंतर घाऊक बाजारपेठेतील दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी अन्न घटकांचा (फूड आर्टिकल्स) महागाईचा दर हा जुलैच्या तुलनेत १.४ टक्क्यांनी वाढला आहे.

संग्रहित - घाऊक बाजारपेठ
author img

By

Published : Sep 16, 2019, 1:20 PM IST

Updated : Sep 16, 2019, 1:25 PM IST

नवी दिल्ली - सरकारी आकडेवारीनुसार घाऊक बाजारपेठेतील किंमत निर्देशांक जुलैनंतर बदलला नाही. हा किंमत निर्देशांक जुलैप्रमाणेच ऑगस्टमध्येही १.०८ टक्के नोंदण्यात आला आहे.

किरकोळ बाजारपेठेतील महागाई भडकल्यानंतर घाऊक बाजारपेठेतील दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये घाऊक किंमत निर्देशांक हा ४.६२ टक्के होता. बिल्ट अप इन्फलेशन हा मागील महागाईचा वर्तमानकाळातील महागाईवर झालेला परिणाम असतो. हा महागाईचा दर १.२५ टक्के राहिला आहे. तर गतवर्षी या महागाईचा दर ३.२७ टक्के होता.

  • अन्न घटकांचा (फूड आर्टिकल्स) महागाईचा दर हा जुलैच्या तुलनेत १.४ टक्क्यांनी वाढला आहे.
  • कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्देशांकात १.४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

किरकोळ बाजारपेठेत महागाईचा भडका, गेल्या १० महिन्यातील सर्वोच्च निर्देशांकाची नोंद

काय आहे घाऊक किंमत निर्देशांक
घाऊक किंमत निर्देशांक हा घाऊक बाजारपेठेतील वाढणाऱ्या किमतीचा दर दर्शवित असतो. यामध्ये ठराविक वस्तुंच्या दरावरून हा निर्देशांक मोजला जातो. त्यासाठी वेगवेगळी वर्गवारी केलेली आहे.

उर्जा वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या थकबाकीत ५७ टक्क्यांची वाढ; ७३ हजार कोटींहून अधिक बोजा

किरकोळ बाजारपेठेत महागाई भडकली!
अर्थव्यवस्थेची घसरण होत असताना वाढत्या महागाईचा चटकाही सर्वसामान्यांना बसू लागला आहे. किरकोळ बाजारपेठेत महागाईने गेल्या १० महिन्यातील सर्वोच्च निर्देशांक गाठला आहे. ऑगस्टमध्ये महागाईचा निर्देशांक हा ३.२१ टक्के नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा- ड्रोन हल्ला झाल्यानंतर सौदीच्या तेल उत्पादनात ५० टक्क्यांची घट

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 16, 2019, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.