नवी दिल्ली/दावोस- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे उपपंतप्रधान शी जिनपिंगसह जगभरातील आघाडीचे नेते उद्या दावोस परिषदेला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. हे परिषद जागतिक आर्थिक मंचाने आयोजित केली आहे. ही परिषद सहा दिवस सुरू राहणार आहे.
चालू आर्थिक वर्षात जागतिक आर्थिक मंचाची दावोस येथील परिषद सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. या परिषदेला १ हजारांहून अधिक नेते उपस्थित राहणार आहे. या परिषदेत विविध देशांचे प्रमुख, मोठ्या कंपन्यांचे सीईओ आणि चेअरमन तसेच विविध संस्थांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत आर्थिक, पर्यावरण, सामाजिक आणि तंत्रज्ञानाच्या आव्हानांवर चर्चा होणार आहे.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प: जीएसटीत कपात करा; मोबाईल उद्योगाची मागणी
जागतिक आर्थिक मंचाच्या माहितीनुसार जी २० मधील प्रमुखांचे १५ विशेष व्यक्तींचे भाषण होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी भाषण करणार आहेत. भारताकडून केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, आरोग्य मंत्री हर्षवर्धन, पेट्रोलियम आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान हे उपस्थित राहणार आहेत. तर उद्योगामधून आनंद महिंद्रा, सलील पारेख आणि शोभना कमीनेनी हे उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा-हरियाणातील कंपनीकडून ३१ लाख गुंतवणुकदारांना चुना; ईडीकडून आरोपपत्र दाखल