नवी दिल्ली - अमेरिकतील नियमन कमी करणार असल्याचे आश्वासन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उद्योजकांना दिले. ते विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. भारताबरोबर व्यापार कराराचे काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, येथे असणे हे गौरवास्पद आहे. आम्ही भारताबरोबर मोठा व्यापार केला आहे. भारत अमेरिकेकडून ३ अब्ज डॉलरचे हेलिकॉप्टर खरेदी करणार आहेत.
हेही वाचा-खुली मिठाई खाताय, १ जूनपासून लागू होणार हा नवा नियम
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, ते खूप कठोर व्यक्ती आहेत. मात्र, ते एक चांगले व्यक्ती आहेत. आम्ही येथे नोकऱ्यांची निर्मिती केली. आम्ही तिथे (अमेरिका) नोकऱ्यांची निर्मिती केली आहे. सरकार केवळ नोकऱ्यांची निर्मिती करण्यासाठी मदत करू शकते. मात्र, खासगी उद्योगांना प्रत्यक्षात नोकऱ्यांची निर्मिती करावी लागते.
अमेरिकेतील नियमनाबाबत ते म्हणाले, काही नियमन हे सरकारी प्रक्रियेनुसार करावे लागते. मात्र, हे सरकार नियमन कमी करण्यासाठी बांधील आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होवू, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. त्यामुळे बाजारात तेजी येईल, असेही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प सरकारने अर्थव्यवस्था, आरोग्य आणि सैन्यासाठी खूप काही केल्याचा त्यांनी दावा केला.
हेही वाचा-रुपया वधारल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर