नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटाने टाळेबंदी असताना देशभरातील राज्यांची आर्थिक स्थिती प्रचंड संकटात आहे. याकडे लक्ष वेधत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यांना केंद्र सरकारच्या तातडीची मदत गरज असल्याचे म्हटले आहे. ते काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या ऑनलाईन बैठकीत बोलत होते.
पी. चिदंबरम म्हणाले, देशात तीन मोठ्या समस्या आहेत. १. राज्यांची आर्थिक स्थिती प्रचंड संकटात आहे. त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. २. राज्यांच्या पायाभूत आरोग्याच्या स्थितीचा प्रश्न सोडवणे गरजे आहे. ३. मानवी दृष्टिकोनातून स्थलांतरित मजुरांना परतण्यासाठी प्रस्ताव ठेवावा.
हेही वाचा-पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज : ३३ कोटी लोकांना मिळाले ३१ हजार २३५ कोटी रुपये!
काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी म्हणाले, वॉचडॉग म्हणून पक्षाची जबाबदारी आहे. विदेशातील भारतीयांची कोरोना टेस्ट घेवून त्यांन खास विमानाने देशात आणावे. त्यासाठी विविध राज्य सरकारशी चर्चा करण्यात यावी.
दरम्यान, टाळेबंदीत अडकून पडलेल्या स्थलंतारित मजुरांचा प्रश्न राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांनी बैठकीत उपस्थित केला.
हेही वाचा-कोरोनाच्या संकटात दारू विक्री सुरू करण्यावर मद्यनिर्मिती उद्योगाची 'ही' आहे भूमिका