पुणे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांनी जीएसटीमध्ये त्रृटी असल्याचे कबूल केले आहे. जीएसटीला शाप म्हणू नका, तर ती सुधारण्यासाठी मदत करावी, असे एका कर व्यावसायिकाच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. त्या कर व्यवसायिकांच्या बैठकीत बोलत होत्या.
शहरात कर व्यवसियाकांसोबत केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर व्यावसायिकाने जीएसटीला 'डॅम इट' असा शब्द वापरला. सीतारामन यांनी प्रश्न विचारत असलेल्या कर व्यवसायिकाला मध्येच थांबवून उत्तर दिले. संसदेत तसेच सर्व विधानसभेत मंजूर झालेल्या कायद्याला शाप (कर्स) म्हणू नका, असे त्यांनी म्हटले.
-
#WATCH Finance Min during interaction with businessmen,entrepreneurs,CAs&others in Pune:We just can't damn GST now. It has been passed in Parliament&in state assemblies. It might have flaws,it might probably give you difficulties but I'm sorry,it's the 'kanoon' of the country now pic.twitter.com/tAPcQmHh5H
— ANI (@ANI) October 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Finance Min during interaction with businessmen,entrepreneurs,CAs&others in Pune:We just can't damn GST now. It has been passed in Parliament&in state assemblies. It might have flaws,it might probably give you difficulties but I'm sorry,it's the 'kanoon' of the country now pic.twitter.com/tAPcQmHh5H
— ANI (@ANI) October 11, 2019#WATCH Finance Min during interaction with businessmen,entrepreneurs,CAs&others in Pune:We just can't damn GST now. It has been passed in Parliament&in state assemblies. It might have flaws,it might probably give you difficulties but I'm sorry,it's the 'kanoon' of the country now pic.twitter.com/tAPcQmHh5H
— ANI (@ANI) October 11, 2019
पुढे सीतारामन म्हणाल्या, मला माहित आहे, तुम्ही तुमच्या अनुभवावर बोलत आहात. मात्र ही देवाने केलेली रचना (जीएसटी) आहे, असे आपण म्हणू शकत नाही. जीएसटीच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी सर्व भागीदारांनी काही उपाय सांगावेत, असेही त्यांनी आवाहन केले. शर्मा यांनी जीएसटीच्या सुधारणेसाठी काही उपाय सूचविले आहेत. याबाबत त्यांना दिल्लीमध्ये भेटण्यास सीतारामन यांनी सांगितले आहे.
-
#WATCH Second part of Nirmala Sitharaman's answer to a question on GST, at an event in Pune, Maharashtra https://t.co/IqoSpaQhcW pic.twitter.com/TG9h5WynGK
— ANI (@ANI) October 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Second part of Nirmala Sitharaman's answer to a question on GST, at an event in Pune, Maharashtra https://t.co/IqoSpaQhcW pic.twitter.com/TG9h5WynGK
— ANI (@ANI) October 11, 2019#WATCH Second part of Nirmala Sitharaman's answer to a question on GST, at an event in Pune, Maharashtra https://t.co/IqoSpaQhcW pic.twitter.com/TG9h5WynGK
— ANI (@ANI) October 11, 2019
हेही वाचा-पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात भारताची व्यापारी तूट कमी करण्यावर चर्चा
सीतारामन यांना प्रश्न विचारलेले कर व्यावसायिक बी . एस. शर्मा हे हे कॉस्ट अकाउंटट असोसिएशनचे सदस्य आहेत. ते म्हणाले, १३ विविध करांसाठी एकच कर, भ्रष्टाचार कमी करणे, करातील किचकटपणा दूर करणे हा जीएसटीचा उद्देश होता. मात्र हे अनेक अडचणींमुळे असे होत नाही. आता, उद्योग आणि व्यवसायिक त्याबाबत तक्रार करत आहेत.
हेही वाचा-पीएमसी बँकेतील घोटाळ्यानंतर आरबीआयने व्यवस्थेत 'हा' केला बदल
जीएसटीचे करसंकलन घटले-
जीएसटीचे करसंकलन कमी झाले आहे. याबाबत विचारले असता त्यांनी नैसर्गिक संकट आणि जीएसटीसाठी कमी भरण्यात येणारे अर्ज या कारणांनी जीएसटीचे करसंकलन कमी झाल्याचे सांगितले. तर काही ठिकाणी जीएसटीचे करसंकलन पुरेसे प्रभावी झाले नसल्याचे सांगितले. महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल आणि उत्तराखंडमधील काही जिल्ह्यांना पूराचा फटका बसला होता. या ठिकाणी परताव्याचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ दिली होती, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान सीतारामन यांनी सनदी लेखापाल, लेखापरीक्षक, कंपनी सचिव आणि वित्तीय क्षेत्रातील इतर भागीदारांशीही चर्चा केली.