ETV Bharat / business

आरबीआय म्हणते, कोरोना रोगाचा पर्यटनासह व्यापारावर होणार परिणाम - Indian Reserve Bank of India

कोरोना जगभरात पसरत असल्याने विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. एअर इंडिया आणि इंडिगोने भारतामधून चीनमध्ये जाणारी विमान सेवा स्थगित केली आहे. जगभरातील अनेक देशांनी सीमा बंद करत चीनमधील नागरिकांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे.

Reserve Bank of India
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
author img

By

Published : Feb 6, 2020, 3:02 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या विषाणूजन्य रोगाचा देशातील येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर आणि जागतिक परिणाम होईल, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

आरबीआयच्या पतधोरण समितीने म्हटले आहे, की जागतिक व्यापारातील अनिश्चितता कमी होण्यासाठी निर्यात आणि गुंतवणुकीच्या चलनवलनाला प्रोत्साहन दिले पाहिजे. कोरोना जगभरात पसरत असल्याने विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. एअर इंडिया आणि इंडिगोने भारतामधून चीनमध्ये जाणारी विमान सेवा स्थगित केली आहे. जगभरातील अनेक देशांनी सीमा बंद करत चीनमधील नागरिकांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे.

अमेरिका-इराणमधील तणावाच्या स्थितीत खनिज तेलाचे व सोन्याचे दर वाढले होते, याची पतधोरण समितीने नोंद घेतली आहे. मात्र, मध्यपूर्वेतील तणाव कमी झाल्यानंतर खनिज तेल व सोन्याचे दर कमी झाल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

हेही वाचा-अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आरबीआयकडे केवळ व्याजदराचे साधन नाही - शक्तिकांत दास

भारताने चीनच्या नागरिकांना देण्यात येणारा ई-व्हिसा तात्पुरत्या काळासाठी बंद केला आहे.अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमधील विशेष वुहान शहरामधील प्रकल्प बंद केले आहे. त्यामुळे चीनमधून भारतात होणाऱ्या आयातीवरही परिणाम झाला आहे. चीनमध्ये कोरोनामुळे सुमारे ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे २८ हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा-आरबीआयकडून ५.१५ टक्के रेपो दर 'जैसे थे'

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.