मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने १० हजार कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी करणार असल्याचे आज जाहीर केले आहे. कोरोनाचे संकट असताना बाजारातील विश्वास व चलन तरलता वाढविण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
कोविड-१९ चा धोका वाढत असताना वित्तीय बाजारपेठेमध्ये तणावाची स्थिती आहे. बाजारातील तरलता आणि स्थैर्य टिकविण्यासाठी आश्वासकता देण्याची गरज असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
हेही वाचा-शेतकरी अडचणीत : ‘सीसीआय’ची तीन आठवड्यांपासून कापूस खरेदी बंद
बाजारातील चलन तरलता आणि वित्तीय स्थिती लक्षात घेवून आरबीआयने २० मार्च सरकारी रोखे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या रोख्यांची मुदत वर्ष २०२२ आणि वर्ष २०२५ ला संपणार आहेत. तर त्यावरील व्याजदर ८.२ टक्के, ७.३७ टक्के, ७.३२ टक्के आणि ७.७२ टक्के असेल, असे आरबीआयने म्हटले आहे.
हेही वाचा-फोन कॉलिंगचे किमान दर निश्चित करण्याला आयएएमएआय संघटनेचा विरोध