नवी दिल्ली - कोरोना पसरत असल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. यावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधानांनी पतमानांकन संस्थांच्या मोहातून बाहेर येत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काहीतरी करावे, असे गांधींनी म्हटले आहे.
राहुल गांधी म्हणाले, मूडीज, एस अँड पी अथवा ट्रम्प काय म्हणतील याची पंतप्रधानांना अधिक चिंता आहे. ते काय म्हणतील याची मला चिंता नाही. मात्र, पंतप्रधानांनी काही तरी करायला पाहिजे. त्यांनी वाळूत डोके ठेवले आहे.
हेही वाचा-कोरोनाने देशाचा जीडीपी घसरून ५.३ टक्के होणार - मूडीजचा अंदाज
विचारलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तर दिले नसल्याचा राहुल गांधींनी दावा केला. पुढे ते म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्था उद्धवस्त होण्याची शक्यता आहे. पुढे काय होणार आहे, याची तुम्हाला कल्पना नाही. देशाला त्सुनामीसारख्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. देशाची अर्थव्यवस्था कठीण स्थितीमधून जात आहे. देशाची बँकिंग व्यवस्था ही प्रत्यक्षात काम करत नाही. जागतिक स्थिती पाहता, आणखी बँका अपयशी ठरण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने लोक बँकांमधून पैसा चोरत आहेत, असा राहुल गांधींनी आरोप केला.
हेही वाचा-येस बँकेच्या शेअरची किंमत २३ रुपयांवरून ६० रुपये; जाणून घ्या, कारण