नवी दिल्ली - सकल आनंद (ग्रॉस हॅपिनेस) हा सकल राष्ट्रीय उत्पन्नाहून कमी नाही, असे मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. सकल आनंद हा शिक्षणाचा मुलभूत पाया आहे. ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनिष शिसोदिया यांच्या 'शिक्षा' या पुस्तक प्रकाशन समारंभात गुरुवारी बोलत होते.
जगाला केवळ राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) नको आहे, तर अधिक हवे आहे. जीडीपीबरोबर सकल आनंदही महत्त्वाचा असल्याची नवी संकल्पना असल्याचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. मुखर्जींनी यावेळी शिक्षकांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित केले पाहिजे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
हेही वाचा-दूरसंचार, वाहन उद्योग आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील नवीन नोकऱ्यांच्या संख्येत घट
पुढे ते म्हणाले, सिसोदिया यांनी पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. हे पुस्तक केवळ संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाही तर शिक्षकांना आणि शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. सध्याच्या काळात हे पुस्तक उपयुक्त असून ते अधिकारी आणि शिक्षणकांना लाभदायी ठरेल, असे मुखर्जी यावेळी म्हणाले.
हेही वाचा-सरकारी मालमत्तेची विक्री: मोदी २.० सरकारचे निर्गुंतवणूक धोरण
दरम्यान, चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ५ टक्के एवढा जीडीपी झाला आहे. हे गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी प्रमाण आहे.