नवी दिल्ली - आज पेट्रोलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. गेली सलग दोन दिवस इंधन दर स्थिर होते. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा इंधन दर वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 35 पैशांची वाढ झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. तर तीन दिवसांपूर्वी डिझेल 28 पैशांनी वाढवले होते.
राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्यावेळी गेल्या मार्च आणि एप्रिलमध्ये पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नव्हती. कच्चे तेल महाग झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही. पण, मेपासून इंधन दर खूप वाढले आहेत. पेट्रोल फक्त 34 दिवसांत 8.84 रुपयांनी महाग झाले आहे.
2 जुलै 2021 रोजी पेट्रोल-डिझेलचे दर -
शहर | पेट्रोल | डिझेल |
दिल्ली | 99.16 | 89.18 |
मुंबई | 104.24 | 96.72 |
चेन्नई | 100.13 | 93.72 |
कोलकाता | 99.04 | 92.03 |
बंगळुरू | 102.48 | 94.54 |
लखनऊ | 96.31 | 89.59 |
भोपाळ | 107.43 | 97.93 |
पाटणा | 101.21 | 94.52 |
डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासायची -
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात. सकाळी 6 वाजता ते अद्यावत होतात. तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर तपासू शकता. इंडियन ऑईल ग्राहक आरएसपी स्पेस पेट्रोल पंपचा कोड 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवल्यास माहिती मिळवू शकतात. तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
वाढत्या इंधन दरासाठी जबाबदार कोण?
कोविड संकटाच्या या काळात जणू जखमेवर मीठ चोळण्याचे कामच सध्या होत आहे. पेट्रोलवर मोठा कर लावल्याने जनता अडचणींच्या खोल भोवऱ्यात अडकत आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे देशभरात नाराजी आहे. पंतप्रधान मोदींनी एलपीजीला जीएसटी अंतर्गत आणण्याची आपल्या सरकारची बांधिलकी व्यक्त केली. पेट्रोल आणि डिझेलदेखील जीएसटीखाली आणण्याची मागणी संसदेमध्ये होत आहे. 2008 साली जेव्हा कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत 150 डॉलर होती, तेव्हा एक लिटर पेट्रोलची किंमत 50 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 35 रुपये होती. आता, जेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलर्स आहे, तेव्हा इंधनाचे दर उच्चांकी का आहेत?, असा सवाल नागरिक करत आहेत.
हेही वाचा - सोन्याला पुन्हा 'झळाळी'; चांदी प्रति किलो १,२३१ रुपयांनी महाग