मुंबई - कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता चलनाच्या तरलतेची अधिक गरज आहे. त्यासाठी राज्यांनी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज देण्यासाठी पुढे यावे, असे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आवाहन केले. यापूर्वी केंद्र सरकारने २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.
नितीन गडकरी म्हणाले, की उद्योग बंद असल्याने अर्थव्यवस्था गंभीर प्रश्नांना सामोरे जात आहेत. बेरोजगारी वाढत आहे. समाजातील सर्व घटक, स्थलांतरित मजूर, माध्यम आणि इतर कर्मचारी हे समस्येला सामोरे जात आहे. मात्र, शेवटी आपण आर्थिक युद्ध आणि कोरोना युद्ध जिंकणार आहोत, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. १० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज हे सार्वजनिक आणि खासगी गुंतवणुकदारांच्या भागीदारीमधून देणे शक्य असल्याचेही गडकरींनी सांगितले.
हेही वाचा-शेअर बाजार ९९६ अंशांनी वधारून स्थिरावला; हे 'आहे' कारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेले २० लाख कोटींच्या पॅकेजमुळे ५० लाख कोटींची चलन तरलता बाजारात येणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
हेही वाचा-सोने खरेदीकडे का असतो महिलांचा कल?; जागतिक सोने परिषदेने हे दिले उत्तर
राष्ट्रीय महामार्गांचे काम हे युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या पाच वर्षात १५ लाख कोटी रुपयांची महामार्गांची कामे केली जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली.