ETV Bharat / business

बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रातील संकटाची पातळी कमी झाली, पण संपले नाही - निर्मला सीतारामन - RBI

एनबीएफसी क्षेत्रासाठी परिपूर्ण असा अर्थसंकल्पातून मार्ग काढण्यात आला आहे. याच्या अंमलबजावणी करण्यासाठी आरबीआयबरोबर देखरेख करणार असल्याची माहिती सीतारमन यांनी दिली.

निर्मला सीतारमन
author img

By

Published : Jul 6, 2019, 8:06 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रातील संकटाबाबत भाष्य केले. या क्षेत्रावरील संकटाची पातळी कमी झाली आहे. मात्र, ते संकट अद्याप संपलेले नाही, असे स्पष्ट मत सीतारमन यांनी व्यक्त केले. ते अर्थसंकल्पानंतरच्या चर्चेत बोलत होत्या.

एनबीएफसीचे मुल्याकंन होत असल्याचे निर्मला सीतारमन यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या, चलनाची तरलता, गव्हर्नन्स, नादारी यांच्या समस्या एनबीएफसी क्षेत्रात उच्चपातळीवर पोहोचल्या होत्या. या क्षेत्राची खूप वाईट अवस्था होती, असे तुम्हाला म्हणायचे असेल तर ती सध्या कमी वाईट आहे, असे म्हणावे लागेल. अधिकाधिक वाईट परिस्थिती होत असताना ती मूळापासून काढण्यात आली आहे.

एनबीएफसी क्षेत्र हे काही काळानंतर कदाचित आणखी सुधारू शकते, ही प्रक्रिया सुरू आहे. या क्षेत्राकरिता परिपूर्ण असा अर्थसंकल्पातून मार्ग काढण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आरबीआयबरोबर देखरेख करणार असल्याची माहिती सीतारमन यांनी दिली.

केंद्रीय अर्थसंकल्पात ही करण्यात आली आहे तरतूद-
एनबीएफसीच्या मालमत्तेला (असेट्स) केंद्र सरकारने अंशत: हमी देण्याची तयारी दर्शविली आहे. आरबीआय चलनाच्या तरलतेसाठी खिडकी सुरू करणार आहे. यातून एनबीएफसीला बँकांची मदत मिळणार आहे. सध्या हे क्षेत्र कोसळण्याच्या टोकावर पोहोचले आहे.

काही एनबीएफसीच्या मालमत्ता (असेट्स) उच्च मानांकन असलेल्या आहेत. अशा १ लाख कोटीपर्यंतच्या मालमत्ता सरकारी बँकांनी घेण्यासाठी सरकार प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी सहा महिन्यापर्यंत सरकार हमी देणार आहे. तर नुकसान झाल्यास १० टक्क्यापर्यंत सरकार तोटा सहन करणार आहे.

Intro:Body:

Biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.