ETV Bharat / business

अर्थसंकल्प सादर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रिफकेसचा 'असा' आहे रंजक इतिहास

अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळी आणण्यात येणाऱ्या ब्रिफकेसचा एक निराळाच इतिहास आहे. आजवर, वेळोवेळी या ब्रिफकेसचा आकार, संरचना (डिझाईन ) आणि रंग बदलत गेला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२०
केंद्रीय अर्थसंकल्प २०२०
author img

By

Published : Jan 29, 2020, 6:22 PM IST

Updated : Jan 30, 2020, 4:53 PM IST

नवी दिल्ली - संसदेत १ फेब्रुवारीला सादर करण्यात येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. याचवेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या मागीलप्रमाणे लाल रंगाच्या पोतडीमध्ये अर्थसंकल्प आणणार की ब्रिफकेसचा वापर करणार याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळी आणण्यात येणाऱ्या ब्रिफकेसचा एक निराळाच इतिहास आहे. आजवर, वेळोवेळी या ब्रिफकेसचा आकार, संरचना (डिझाईन ) आणि रंग बदलत गेला आहे. अर्थसंकल्प सादर करताना कधी लाल तर कधी काळा तर कधी तपकिरी रंगाच्या सुटकेस आजवर दिसून आल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये विविध केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वेगवेगळ्या रंगाच्या ब्रिफकेसचा वापर केला आहे. वित्त मंत्रालय केंद्रीय अर्थमंत्र्यांना तीन ते चार बॅगचा पर्याय देत असते. यामध्ये त्यांच्या निवडीनुसार बॅगची निवड करण्यात येते.

हेही वाचा-एअर इंडियाच्या विक्रीचा सौदा : खरेदीदाराला काय मिळणार?

-केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ब्रिफकेसचा असा आहे रंजक इतिहास

-स्वातंत्र्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या रंगाच्या ब्रिफकेसचा केला वापर-

  • भारताचे पहिले केंद्रीय अर्थमंत्री आर.के.षणमुखम चेट्टी यांनी १९४७ ला पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रे कातडी बॅगेत ठेवली होती.
  • १९५६ ते १९५८ आणि १९६४ ते १९६६ दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री राहिलेल्या टी.टी. कृष्णमाचारी यांनी फाईल बॅगेमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे नेली होती.
  • देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५८ मध्ये काळ्या रंगाच्या ब्रिफकेसचा वापर केला होता.
  • १९७० नंतर देशाच्या अर्थमंत्र्यांनी क्लासिक हार्डटॉपच्या ब्रिफकेसचा वापर सुरू केला आहे. अटल बिहारी वाजपेयी सरकार यांच्या कार्यकाळात यशवंत सिन्हा यांनी आणलेली ब्रिफकेसला पट्टे होती. अशी ब्रिफकेस ही ब्रिटनच्या चान्सेलर यांच्याकडे होती.
  • माजी पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री मनमोहस सिंग यांनी वापरलेली ब्रिफकेस ही ब्रिटनचे माजी चॅन्सलर विल्यम एवर्ट ग्लॅडस्टोन यांच्या ब्रिफकेससारखी होती.
  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात केंद्रीय अर्थमंत्री असताना पी.चिदंबरम यांनी साध्या तपकिरी आणि लाल रंगाच्या ब्रिफकेसचा वापर केला होता.
  • मोदी सरकारमध्ये असताना अरुण जेटली यांनी २०१४ मध्ये तपकिरी रंगाच्या ब्रिफकेसचा वापर केला. तर दुसऱ्या वर्षी व २०१७ मध्ये गडद तपकिरी रंगाच्या ब्रिफकेसमधून त्यांनी अर्थसंकल्पाची कागदपत्रे संसदेत आणली होती.
  • २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना पीयूष गोयल यांनी लाल रंगाच्या ब्रिफकेसचा वापर केला होता.
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ५ जुलै २०१९ ला लाल रंगाच्या कापडामध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे आणून ब्रिफकेसची परंपरा मोडीत काढली. लाल रंगाच्या कापडात म्हणजे चोपडीत खातेवही ठेवण्याची परंपरा असल्याचे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णुर्ती सुब्रमण्यन यांनी सांगितले होते.

हेही वाचा-' लोकांना अलंकारिक अथवा अपशब्द नव्हे, अर्थव्यवस्थेची वस्तुस्थिती ऐकायची आहे '

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
Last Updated : Jan 30, 2020, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.