नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रोजगार निर्मिती कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत जानेवारीत ६.९ टक्क्यांची घट झाल्याचे ईएसआयसी आकडेवारीतून दिसून आले आहे.
२.०८ कोटी व्यक्तींनी स्पटेंबर २०१७ ते जानेवारी २०१९ पर्यंत ईएसआयसी योजनेसाठी नोंदणी केली आहे. या योजनेतून आरोग्य आणि वैद्यकीय सेवा पुरविल्या जातात.
काय आहे ईएसआयसी योजनेसाठी अट-
- संस्थेमध्ये २० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असणे.
- जास्तीत जास्त २१ हजार रुपयापर्यंत वेतन
ईएसआयसीच्या सभासदांची आकडेवारी ही केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (सीएसओ) दिली जाते. सीएसओ ही भविष्य निर्वाह निधी योजना, कर्मचारी विमा योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना यांची आकडेवारी जाहीर करत असते.
ईपीएफओच्या आकडेवारीनुसार औपचारिक क्षेत्रात (formal sector ) गेल्या १७ महिन्यामध्ये सर्वात अधिक ८.९६ टक्के रोजगार निर्मिती झाली आहे.जानेवारीत ईपीएफओची नोंदणी करणाऱ्यांची संख्या गतवर्षीच्या जानेवारीहून १३१ टक्के अधिक आहे. ईपीएफओच्या आकडेवारीनुसार सामाजिक सुरक्षा योजनेत ७६.४८ लाख नव्या सभासदांची नोंदणी करण्यात आली आहे. ही नोंदणी सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१९ मध्ये दिसून आली आहे.
कोणाला मिळतो ईपीएफओचा लाभ
ज्या संस्थांमध्ये २० किंवा त्याहून कमी कर्मचारी आहेत, ज्यांचे १५ हजारांहून कमी वेतन आहे. त्यांच्यासाठी ईपीएफओचा लाभ दिला जातो.राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१९ दरम्यान १० लाख ३० हजार ९५९ नोंदणी झाली आहे. या योजनेतकेंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने सहभाग घेता येतो.