नवी दिल्ली - कोरोनाने फेब्रुवारीमध्ये निर्यात आणि पुरवठा साखळीवर परिणाम झाला. त्यामुळे फेब्रुवारीत उत्पादन क्षेत्राची अंशत: घसरण झाली आहे. देशातील उत्पादन उत्पादन क्षेत्राने जानेवारीत गेल्या आठ वर्षातील उच्चांक नोंदविला होता.
फेब्रुवारीत ५४.५ आयएचएस मर्किट भारतीय उत्पादन खरेदी व्यवस्थापन निर्देशांकाची (पीएमआय) नोंद झाली आहे. तर जानेवारी ५५.३ पीएमआयची नोंद झाली होती. सलग ३१ व्या महिन्यात उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक ५० हून अधिक नोंदविण्यात आला आहे. जर पीएमआय ५० हून अधिक असले तर विस्तार व ५० हून अधिक पीएमआय असेल तर घसरण मानली जाते.
हेही वाचा-टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीत फेब्रुवारीमध्ये ३४ टक्क्यांनी घसरण
देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारातून चांगली मागणी असल्याने जानेवारीत देशातील उत्पादनाला चांगला लाभ झाला आहे. ही मागणी झाल्याने कंपनी आणखी उत्पादन वाढवू शकता. त्यासाठी लागणारा उत्पादन खर्च कधी नव्हे तेवढा कमी झाल्याचे आयएचएस मर्किटच्या मुख्य अर्थतज्ज्ञ पॉलियान्ना डी लामा यांनी सांगितले.
हेही वाचा-विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत महानगरांमध्ये ५३ रुपयांनी कपात
कोव्हिड-१९ चा प्रसार हा भारतीय वस्तू उत्पादकांसाठी धोक्यांची घटा आहे. त्यामुळे भारतीय निर्यात आणि पुरवठा साखळीला धोका आहे. व्यवसायातून कमी उत्पादन होणार असल्याने कमी विश्वास आहे. त्यामुळे नोकऱ्या देण्याच्या प्रमाणांवर बंधने येणार आहेत.