नवी दिल्ली - भारतीय उत्पादन क्षेत्राने सलग तिसऱ्या महिन्यात वृद्धीदर अनुभवला आहे. ऑक्टोबर महिन्यातील उत्पादन क्षेत्राचा वृद्धीदर हा गेल्या १३ वर्षात सर्वाधिक वेगाने वाढल्याचे सर्वेक्षणात दिसून आले.
आयएचएस मर्किट इंडिया मॅन्युफॅक्युचरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्सच्या (पीएमआय) सर्वेक्षणानुसार सप्टेंबरमध्ये उत्पादनाचा निर्देशांक ५६.८ होता. तर ऑक्टोबरमध्ये ५८.९ निर्देशांक होता. हा गेल्या दशकभरातील सर्वाधिक वेगाने वाढलेला वृद्धीदर होता. सलग ३२ महिने वृद्धीदर असलेल्या उत्पादन क्षेत्राला एप्रिलमध्ये ब्रेक लागला होता.
रोजगाराबाबत निराशाजनक स्थिती-
कोरोना महामारीत लागू करण्यात आलेल निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्पादन क्षेत्रात सुधारणा होत असल्याचे आयएचएस मर्किटच्या अर्थतज्ज्ञ, सहाय्यक संचालक पॉलियान्ना डी लामा यांनी सांगितले. मात्र, रोजगाराबाबत निराशाजनक स्थिती आहे. ऑक्टोबरमध्ये पेरॉल नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याचे आयएचएस मर्किटच्या सर्वेक्षणात दिसून आले. कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने विश्वास वाढत आहे. उद्योग पुन्हा खुले झाल्यानंतर उत्पादनात वाढ होईल, असेही लिमा यांनी सांगितले.
काय आहे पीएमआय?
जर पीएमआय हा ५० हून अधिक असेल तर उत्पादन वाढल्याचे सूचित होते. तर पीएमआय हा ५० हून कमी असेल तर उत्पादन घसरल्याचे सूचित होते.