ETV Bharat / business

आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये ४.२ टक्के विकासदर; गेल्या ११ वर्षातील नीचांक

केंद्र सरकारने २५ मार्चला देशभरात टाळेबंदी लागू केली. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच टाळेबंदी लागू केल्याने राज्यांसह व केंद्र सरकारचे मोठे महसुली उत्पन्न बुडाले आहे.

author img

By

Published : May 29, 2020, 6:40 PM IST

Updated : May 29, 2020, 9:55 PM IST

जीडीपी
जीडीपी

नवी दिल्ली - कोरोनाच्या महामारीने अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. मागील वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) अर्थव्यवस्थेचा विकासदर (जीडीपी) ३.१ टक्के नोंदविण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये वार्षिक विकासदर ४.२ टक्के राहिला आहे. हा ११ वर्षातील सर्वात कमी विकासदर राहिला आहे.

देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पादनाची आकडेवारी (जीडीपी) आज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ६.१ टक्के विकासदर होता.

तिमाहीप्रमाणे देशाचा विकासदर
तिमाहीप्रमाणे देशाचा विकासदर

हेही वाचा-महामारीत नोकऱ्या गमविण्याचे प्रमाण किती? सरकार गोळा करणार आकडेवारी

मागील आर्थिक वर्षात मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे अनेक उद्योगांना फटका बसला होता.

मार्चच्या शेवटच्या सात दिवसात १.४ लाख कोटींचे नुकसान-

मार्चच्या शेवटच्या सात दिवसात संपूर्णपणे देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे सात दिवसात १.४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे इकोरॅप अहवालात म्हटले आहे. देशातील १० राज्ये हे देशाच्या जीडीपीत ७५ टक्के योगदान देतात. त्यापैकी एकट्या महाराष्ट्राचे देशाच्या जीडीपीच्या १५.६ टक्के नुकसान झाले आहे.

आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी टाळेबंदी लागू केल्याने राज्यांसह व केंद्र सरकारचे मोठे महसुली उत्पन्न बुडाले आहे. कोरोनाच्या संकटाने देशातील मागणीचे प्रमाण घसरल्यानेही अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे.

हेही वाचा-मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत विकासदर १.२ टक्के राहिल - एसबीआय

Last Updated : May 29, 2020, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.