नवी दिल्ली - गतवर्षी भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती राहिली असती तरी व्यापारात भिन्न स्थिती राहिली आहे. भारतामधून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीत १६.१५ टक्क्यांची वाढ होऊन २०.८७ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. लोह, स्टील, अॅल्युमिनीयम आणि ताब्यांची चीनमध्ये निर्यात वाढ झाल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
निर्यातीचे प्रमाण वाढल्याने चीनबरोबरील व्यापार तुटीत १९.३९ टक्क्यांची घसरण झाली आहे. भारत-चीनमध्ये २०१९ मध्ये व्यापार तुटीचे प्रमाण ५६.९५ अब्ज डॉलरवरून २०२० मध्ये ४५.९१ अब्ज डॉलर झाले आहे.
हेही वाचा-आयटी क्षेत्रामधील नोकऱ्यांमध्ये जानेवारीत ३९ टक्क्यांची वाढ
- द्विपक्षीय व्यापारामध्ये २०२० मध्ये २०१९ च्या तुलनेत ५.६४ टक्क्यांची घसरण झाली आहे.
- भारतामधून चीनमध्ये साखर, सोयाबीन तेल, पालेभाज्या व तेल यांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. मात्र, आंबे, माशांचे तेल, चहा आणि ताज्या द्राक्षांच्या निर्यातीत घसरण झाली आहे. चीनमधून भारतात इलेक्ट्रिकल मशिनरी, बॉयलर, मशिनरी, प्लास्टिक्स आणि प्लास्टिकची उत्पादने, स्टील, फर्निचर, खते, वाहनांचे सुट्टे भाग, खेळणी आणि खेळांच्या वस्तू यांच्या निर्यातीत वाढ झाली आहे.
हेही वाचा-वैयक्तिक गोपनीयतेकरता जागतिक पातळीवर नियम व्हावेत- सत्या नाडेला
फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष एस. के. सराफ म्हणाले की दोन्ही देशांमध्ये निर्यातीच सकारात्मक चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे देशातील निर्यातदारांमध्ये स्पर्धात्मकता वाढत आहे.
दरम्यान, २०२० मध्ये भारत-चीनमध्ये पूर्व लडाखमधील सीमारेषेवर तणावाची स्थिती होती. त्याचे पडसाद द्विपक्षीय व्यापारी संबंधावर निर्माण झाले आहेत.