नवी दिल्ली - मागणीप्रमाणे जास्ती जास्त लोकसंख्येपर्यंत लसीकरण पोहोचल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था चांगली होईल, असे मत आरबीआयच्या पतधोरण समितीच्या सदस्या अशिमा गोयल यांनी व्यक्त केले. लसीकरण झाल्यानंतर मागणी, जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा आणि आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने चलनवलनाला चालना मिळेल, असेही गोयल यांनी म्हटले आहे.
अर्थतज्ज्ञ अशिमा गोयल म्हणाल्या, की कोरोनाची देशात दुसरी लाट येण्याची भीती आहे. लशीच्या उत्पादनात जागतिक केंद्र होण्याची भारताची क्षमता आहे. लशींचे उत्पादन वाढविल्यानंतर लवकरच हे शक्य होणार आहे. स्थानिक भागात करण्यात आलेले लॉकडाऊन काढल्यानंतर पुन्हा अर्थव्यवस्था सुधारणार आहे. कमी प्रमाणात पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे.
हेही वाचा-एलॉन मस्क असल्याचे भासवित क्रिप्टोकरन्सीमध्ये २ दशलक्ष डॉलरची फसवणूक
आर्थिक महासत्ता होण्याचे उद्दिष्ट लांबणीवर-
देशाने २०२४-२५ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सध्याचे वाढलेले लॉकडाऊन आणि अभूतपूर्व महामारीमुळे हे उद्दिष्ट पूर्ण करण्याला अधिक वेळ लागणार असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे. कोरोना महामारीबाबत असलेल्या अनिश्चितता आणखी संपलेल्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा-संपूर्ण देशात लसीकरण होण्याकरिता दोन-तीन वर्षे लागणार-अदर पुनावाला
कर्जाचा पुरवठा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज
दोन सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्याबाबत बोलतोना अर्थतज्ज्ञ अशिमा गोयल म्हणाल्या, की काही सार्वजनिक बँका अधिक उर्जादायी आणि शक्तीशाली झाल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत कर्जाचा पुरवठा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज होती. २०१० मध्ये खासगी कर्जपुरवठ्यात भारत हा जगात सर्वात कमी प्रमाण असलेला देश होता. यापुढे सांगायचे झाले तर मालकीत वैविध्यता आणि रणनीतीने वित्तीय क्षेत्रात अधिक स्थिरता निर्माण होते.