ETV Bharat / business

भारतीय बँकिंग क्षेत्र सदृढ आणि स्थिर - शक्तिकांत दास - RBI governor

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पीएमसी आणि लक्ष्मी विलास बँकेच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. अनेक सहकारी बँकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवण्यात येवू नये, असे शक्तिकांत दास यांनी म्हटले.

आरबीआयच्या पतधोरण समितीची पत्रकार परिषद
author img

By

Published : Oct 4, 2019, 4:17 PM IST

नवी दिल्ली - भारतीय बँकिंग व्यवस्था सदृढ आणि स्थिर आहे. एका घटनेचा संपूर्ण व्यवस्थेच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकत नाही, असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. ते आरबीआयचे तिमाही पतधोरण जाहीर करताना पत्रकार परिषदेत बोलत होते.

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील (पीएमसी) मोठा घोटाळा उघडकीला आला आहे. त्यामुळे विविध बँकांचे ठेवीदार चिंताग्रस्त झाले आहेत. याबाबत बोलताना शक्तिकांत दास म्हणाले, लोकांनी आणि ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. विनाकारण चिंताग्रस्त होण्याची गरज नाही. अफवांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण होते.

हेही वाचा-केंद्र सरकारकडून पैशाची मागणी झाल्याची माहिती नाही - आरबीआय गर्व्हनर

दुसऱ्या प्रकरणात भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर तात्पुरती सुधारणात्मक आकृतीबंधाची (प्रॉम्पट करेक्टिव्ह अॅक्शन) कारवाई केली आहे. या बँकेवर वाढलेल्या बुडित कर्जामुळे कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा-आरबीआयकडून जीडीपी कमी राहण्याचा अंदाज; शेअर बाजार निर्देशांकात २०० अंशाची घसरण

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पीएमसी आणि लक्ष्मी विलास बँकेच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. अनेक सहकारी बँकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवण्यात येवू नये, असे शक्तिकांत दास यांनी म्हटले. एक घटना सर्व सहकारी बँकांच्या आरोग्याबाबत लागू करू नये, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा-आरबीआयकडून पतधोरण जाहीर.. व्याजदर आणखी स्वस्त; रेपो दरात २५ बेसिस पाँईटने कपात

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.