ETV Bharat / business

उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीत घसरण; गेल्या १५ महिन्यात ऑगस्टमध्ये पीएमआयचा निचांक - भारतीय अर्थव्यवस्था

विक्रीचे घटलेले प्रमाण, कमी झाले उत्पादन आणि रोजगाराचे कमी प्रमाण या कारणांनी पीएमआयचे प्रमाण कमी झाले आहे.  आयएचएस मार्किट इंडियाचा निर्मिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांक हा ऑगस्टमध्ये ५१.४ टक्के नोंदविण्यात आला आहे. हे मे २०१८ नंतर सर्वात कमी प्रमाण आहे.

संग्रहित
author img

By

Published : Sep 2, 2019, 2:07 PM IST

नवी दिल्ली - देशातील उत्पादन क्षेत्राची कामगिरी ऑगस्टमध्ये आणखीनच घसरली आहे. गेल्या १५ महिन्यातील निर्मिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांकाचा (पीएमआय) निचांक ऑगस्टमध्ये नोंदविण्यात आला आहे.

विक्रीचे घटलेले प्रमाण, कमी झाले उत्पादन आणि रोजगाराचे कमी प्रमाण या कारणांनी पीएमआयचे प्रमाण कमी झाले आहे. आयएचएस मार्किट इंडियाचा निर्मिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांक हा ऑगस्टमध्ये ५१.४ टक्के नोंदविण्यात आला आहे. हे मे २०१८ नंतर सर्वात कमी प्रमाण आहे.

हेही वाचा-खाणसह उत्पादन क्षेत्राची सुमार कामगिरी, औद्योगिक उत्पादन निर्देशांक घसरून ३.१ टक्क्यावर

सलग २५व्यांदा उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक हा ५० अंशावरून अधिक राहिला आहे. पीएमआय हा ५० हून अधिक असणे म्हणजे उत्पादन क्षेत्राचा विस्तार होणे आहे. तर ५० हून कमी पीएमआय होणे म्हणजे उत्पादन क्षेत्र संकुचित होणे आहे. अर्थव्यवस्था मंदावल्याचे ऑगस्टमध्ये दिसून आले. त्यामुळे भारतीय उत्पादन उद्योगाला झळ बसली असल्याचे आयएचएस मॅर्किटचे मुख्य अर्थतज्ज्ञ पॉलियान्ना डी. लिमा यांनी सांगितले.

हेही वाचा-उत्पादन क्षेत्राची मे महिन्यात चांगली कामगिरी, रोजगार निर्मितीचे वाढले प्रमाण

देशाचा जीडीपी सलग पाचव्या तिमाहीदरम्यान घसरून ५ टक्के झाला आहे. मागणी झाली असताना गुंतवणूकीचे प्रमाण कमी झाले आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची मे महिन्यात ५२.७ एवढी नोंद झाली आहे.

हेही वाचा-वाहन उद्योगात मंदी : महिंद्रा अँड महिंद्राच्या उत्पादनाला ८ ते १४ दिवस लागणार 'ब्रेक'

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.