नवी दिल्ली - गेल्या सात वर्षात प्रथमच एप्रिल-जूनदरम्यान जीडीपीचा नीचांक नोंदविण्यात आला आहे. एप्रिल जूनदरम्यान ५ टक्के जीडीपी राहिला आहे. उत्पादन क्षेत्रामधून घटलेले उत्पादन व कृषी उत्पन्नामधील घट याचा परिणाम जीडीपीवर झाल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसून आले आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा २०१२-१३ मध्यी एप्रिल-जूनदरम्यान ४.९ टक्के जीडीपी नोंदविण्यात आला होता. तर आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये ८ टक्के जीडीपीची नोंद झाली होती.
आरबीआयने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जीडीपी हा ७ टक्के राहिल असा अंदाज जूनच्या तिमाहीदरम्यान वर्तविला होता. यामध्ये बदल करून जीडीपी हा ६.९ टक्के राहिल, असा अंदाज वर्तविला आहे.
विकास दर उंचावण्यासाठी मागणी वाढविण्यावर भर द्यावा, असे आरबीआयने अधोरेखित केले होते.