ETV Bharat / business

ह्युस्टनमधील पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर भारताला जीएसपीचा दर्जा मिळण्याची शक्यता

author img

By

Published : Sep 21, 2019, 3:21 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओबरोबर ह्युस्टनमध्ये बैठक घेणार आहेत. यामध्ये एअर प्रोडक्टस, बेक हगेस व ब्रिटिश पेट्रोलियम या कंपन्यांचा समावेश आहे.   'हाऊडी मोदी' कार्यक्रमात मोदी हे अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करणार आहेत.

संग्रहित

न्यूयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ह्युस्टनमधील कार्यक्रमात आज सहभागी होणार आहेत. यावेळी अमेरिका व भारताकडून दोन्ही देशांमधील व्यापारासाठी पॅकेज जाहीर होणार आहे. भारताचा व्यापार प्राधान्यक्रमाचा दर्जा (जीएसपी) ५ जूनला काढून घेण्यात आलेला दर्जा अमेरिका पुन्हा देण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओबरोबर ह्युस्टनमध्ये बैठक घेणार आहेत. यामध्ये एअर प्रोडक्टस, बेक हगेस व ब्रिटिश पेट्रोलियम या कंपन्यांचा समावेश आहे. 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात मोदी हे अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा-जीएसटी कपात; जाणून घ्या, काय महागणार अन् काय होणार स्वस्त!

पंतप्रधान मोदी हे ब्लुमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरमला उपस्थित राहणार आहेत. भारतामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी ते कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात मोठ्या ४५ कंपन्या सहभागी होणार आहे. यामध्यो कोका-कोला, पेप्सी, मास्टरकार्ड, व्हिसा, अॅमवे, जे पी मॉर्गॅन, लॉकहार्ड मार्टिन, वॉलमार्ट, गुगल, एचपी, अॅमेझॉन रिटेल, मायक्रोसॉफ्ट आदी कंपन्यांचा समावेश आहे. मोदी आणि ट्रम्प यांची न्यूयॉर्कमध्ये २४ सप्टेंबरला बैठक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-'कर कपात केल्याने निर्मला सीतारामन यांना सलाम'

अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींचा भारताला जीएसपी देण्याचा आग्रह
अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींनी अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लिथीजर यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये तडजोडी न केल्याने अमेरिकन उद्योगांना भारतीय बाजारपेठ दीर्घकाळासाठी उपलब्ध होणार नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ सप्टेंबरमध्ये ह्युस्टनमधील कार्यक्रमात भेटणार आहेत. यामध्ये दोन्ही देशामध्ये व्यापारामधील वाद आणि जीएसपीवर निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-एकाच दिवसात शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या भांडवली मूल्यात ७ लाख कोटींची भर!

काय आहे जीएसपी-
जनरलाईज्ड सिस्टिम ऑफ प्रिफरन्स (जीएसपी) हा अमेरिकेचा सर्वात जुना आणि मोठा व्यापार प्राधान्यक्रम कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत लाभार्थी देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी अमेरिकेकडून त्या देशाच्या हजारो उत्पादनांवरील आयात शुल्क माफ करण्यात येते.

असा मिळतो भारताला फायदा-
जीएसपी कार्यक्रमांतर्गत भारताच्या सुमारे २००० उत्पादनांना विना आयात शुल्क अमेरिकेच्या बाजारपेठेत विक्री करण्याची संधी मिळते. यामध्ये ऑटो आणि वस्त्रोद्योग उत्पादनांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचा भारत २०१७ मध्ये सर्वात मोठा लाभार्थी देश ठरला आहे. भारताने ५.७ अब्ज डॉलर किमतीच्या उत्पादनांची अमेरिकेत निर्यात केली आहे. ही आकेडवारी काँग्रेसेशनल रिसर्च सर्व्हिसने जानेवारीत प्रसिद्ध केली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.