नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी 2021 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या विकासदरात दहा टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
अर्थसंकल्पाच्या भाषणात, देशातील निर्यात वाढवण्यासाठी निर्विक योजना सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. याद्वारे देशातील निर्यातीला चालना मिळणार आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच खासगीकरणाराद्वारे डेटा सेंटर पार्क उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आर्थिक क्षेत्राच्या वृद्धीसाठी करण्यात आलेल्या सुधारणा
- उद्योगांसाठी २७ हजार ३०० कोटींचा निधी
- 2021 या आर्थिक वर्षापर्यंत जीडीपी वाढीचा दर 10 टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य
- प्रत्येक जिल्हा 'एक्सपोर्ट हब' असणार
- निर्यात सुरळीतपणे चालण्यासाठी निर्विक योजनेची सुरुवात
- इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची भारतात निर्मिती करण्यावर भर
- प्रायव्हेट सेक्टरने उभारलेल्या डेटा सेंटर्सला प्रोत्साहन
- यावर्षी देशातील एक लाख ग्रामपंचायतींना 'ऑप्टिकल फायबर नेट' सुविधा देणार
- 'भारत नेट प्रोग्रॅम'साठी सहा हजार कोटींचा निधी
- 'नॅशनल टेक्नीकल टेक्सटाईल मिशन'ची घोषणा - 1,480 कोटींची तरतूद
- गुतंवणुकीच्या सुलभतेसाठी 'इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स सेल'ची लकरच घोषणा
- सार्वजनिक-खासगी भागिदारी (पीपीपी) मॉडेलवर आधारित पाच नव्या स्मार्ट सीटीज् उभारणार