ETV Bharat / business

'भविष्य हे कृषी क्षेत्राच्या बाजूने झुकत आहे'

कृषी क्षेत्रात मुक्त व्यापार करण्याच्या सुविधा देण्यात येणार आहेत. जर आपण जागतिक मुल्यवर्धित 1 टक्का जरी सहभाग घेतला तर देशात दरडोई उत्पन्न हे 1 टक्क्यांहून अधिक वाढू शकते, याकडे शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले.

शक्तिकांत दास
शक्तिकांत दास
author img

By

Published : Jul 27, 2020, 6:01 PM IST

नवी दिल्ली कृषी क्षेत्रातील सुधारणांमुळे गुंतवणुकीच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कृषी क्षेत्र हे वेगाने विकसित होणार क्षेत्र आहे. अर्थव्यवस्थेत भविष्य हे कृषी क्षेत्राच्या बाजुने झुकल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास केले. ते भारतीय औद्योगिक महासंघाच्या (सीआयआय) कार्यक्रमात बोलत होते.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पायाभूत क्षेत्रामधील गुंतवणुकीबाबत सीआयआयच्या कार्यक्रमात मत व्यक्त केले. ते म्हणाले, की जेव्हा कृषी क्षेत्राच्या बाजूने व्यापार झुकतो, तेव्हा कृषी क्षेत्राचा एकत्रित मुल्यवर्धित विकास हा वार्षिक 3 टक्क्यांहून वाढतो.किमान आधारभूत किंमत हे आजवर प्रमुख साधन राहिले आहे. मात्र, किमतीत सवलती देणे खर्चिक, अपुरे आणि विस्कळित करणारे आहे. अधिक उत्पन्न झाल्यानंतर त्याचे व्यवस्थापन करण्याच्या स्थितीत भारत सध्या पोहोचला आहे. हे मुख्य आव्हान आहे. त्यामुळे धोरणात्मक रणनीती या शेतकऱ्यांचे खात्रीशीर व शाश्वत वाढविण्याकडे वळवायला हवी. त्याचबरोबर ग्राहकांना वाजवी दरात अन्न मिळायला हवे.

देशात पुरवठा साखळी ही कार्यक्षम असणे महत्त्वाचे आहे. महत्त्वाच्या सुधारणा करून भांडवलीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रात मुक्त व्यापार करण्याच्या सुविधा देण्यात येणार आहेत. जर आपण जागतिक मुल्यवर्धित साखळीत 1 टक्का जरी सहभाग घेतला तर देशात दरडोई उत्पन्न हे 1 टक्क्यांहून अधिक वाढू शकते, याकडे शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले.

दरम्यान, चालू आर्थिक वर्षात केवळ कृषी क्षेत्राचा विकास वधारणार असल्याचा अंदाज आरबीआयने यापूर्वी अहवालात व्यक्त केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.