नवी दिल्ली - नवीन लाँच झालेल्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये दुसऱ्याच दिवशी तांत्रिक त्रुटी निर्माण झाली आहे. याची दखल घेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट ट्विट करत वेबसाईटचे काम करणारी इन्फोसिस आणि सहसंस्थापक नंदन निलकेणी यांना तांत्रिक त्रुटी करण्याचे सांगितले आहे.
कर व्यावसायिकाने नवीन ई-फायलिंग पोर्टल सुरू होत नसल्याचे ट्विट करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांना टॅग केले आहे. या ट्विटनंतर पोर्टलच्या समस्येची केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दखल घेतली आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कर व्यावसायिकाचे ट्विट रिट्विट करत इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकेणी आणि इन्फोसिसला यांना कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की ई-फायलिंग पोर्टल २.० हे काल रात्री पावणे आठ वाजता लाँच झाले आहे. माझ्या टाईमलाईनवर पोर्टलबाबतच्या तक्रारी व त्रूटी दिसून आल्या आहेत. तुम्ही करदात्यांना देण्यात येणारी सेवा कमी पडू देणार नाही, अशी आशा आहे.
हेही वाचा-डॉलरचे मूल्य बळकट झाल्याने सोन्याच्या दरात प्रति तोळा 152 रुपयांची घसरण
इन्फोसिसकडे पोर्टलचे कंत्राट-
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नवीन पोर्टल लाँच केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. केंद्रीय प्राप्तिकर विभागाने करदात्यांना परतावा भरणे सोयीस्कर होण्यासाठी नवीन ई-फायलिंग पोर्टल सोमवारी लाँच केले आहे. हे पोर्टल विकसित करण्याचे कंत्राट इन्फोसिसला देण्यात आले आहे. इन्फोसिसने जीएसटी पेमेंट आणि परतावा भरण्यासाठी जीएसटी नेटवर्क पोर्टल विकसित केले आहे.
हेही वाचा-प्राप्तिकर विभागाचे नवीन ई-फायलिंग पोर्टल लाँच; 'या' मिळणार सुविधा