नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दर स्थिर ठेवले आहेत. मात्र, ही शेवटची वेळ नसेल, तर पुढील पतधोरणातही रेपो दर स्थिर राहण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ आणि बँकांचे वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत. आरबीआयला विकासदराबरोबर वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याची कसरत करावी लागणार आहे. कारण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अजूनही अर्थव्यवस्था रुळावर आलेली नाही.
आरबीआयने शुक्रवारी पतधोरण जाहीर करताना सलग सहाव्यांदा रेपो दर चार टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत बोलताना येस बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ इंद्रनील पन ईटीव्ही भारती बोलताना म्हणाले, की आरबीयआयकडून व्याज स्थिर राहण्याची शक्यता होती. पुढील मार्गदर्शनासाठीही स्थिती जैसे थे ठेवण्याची शक्यता होती. आरबीआयकडून विकासदराला चांगले प्रोत्साहन मिळण्याकरता हे धोरण जास्तीत जास्त काळ ठेवले जाऊ शकते. निवडक क्षेत्रात चलनाची तरलता असताना विकासाकडे झुकल्याचा आरबीआयने संदेश दिला आहे.
हेही वाचा-महामारीतही स्टार्टअपची चमकदार कामगिरी; १.१७ लाख रोजगाराची निर्मिती
आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अनघा देवधर म्हणाल्या, की आरबीआयची पतधोरण समिती एकमताने रेपो दर स्थिर ठेवण्याची अपेक्षा होती. मंदावलेला विकासदर आणि वाढती महागाई या पार्श्वभूमीवर रेपो दर स्थिर ठेवण्यात आल्याचे देवधर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
हेही वाचा-नीती आयोगाकडून बँक ऑफ महाराष्ट्राच्या खासगीकरणाची केंद्राला शिफारस
आरबीआयकडून जीडीपीच्या अंदाजित विकासदरात घसरण
आरबीआयने चालू आर्थिक वर्षाचा अंदाजित रियल जीडीपीचा विकासदर हा १०० बेसिसने कमी होऊन ९.५ टक्के होईल, असा नवा अंदाज केला आहे. आरबीआयच्या सुधारित अंदानुसार पहिल्या तिमाहीत विकासदर २६.२ टक्क्यांऐवजी १८.५ टक्के विकासदर होईल.
हेही वाचा-नवीन डिजीटल कायद्याच्या अंमलबजावणीकरिता केंद्राची ट्विटरला अंतिम नोटीस
महागाई वाढण्याचा अंदाज
चालू आर्थिक वर्षात महागाई वाढणार असल्याचा अंदाजही आरबीआयने वर्तविला आहे. आरबीआयच्या अंदाजानुसार ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचे प्रमाण पहिल्या तिमाहीत ५.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ५.४ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.७ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.३ टक्के महागाई होण्याचा अंदाज आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्य कांती घोष म्हणाले, की आरबीआयपुढे महागाईचे व्यवस्थापन करणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. कारण इंधनाचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे.