ETV Bharat / business

राहुल गांधींनी अर्थव्यवस्थेच्या उद्धवस्त होण्याची सांगितली 'ही' तीन कारणे; केंद्रीय अर्थमंत्र्यांवर साधला निशाणा - Rahul Gandhi on Act of God Remark

चालू वर्षात आपण असामान्य स्थितीला सामोरे जात आहोत. आपण देवाच्या कृतीला तोंड देत आहोत, असे विधान केल्याने राहुल गांधींनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Aug 29, 2020, 11:57 AM IST

नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था ही नोटाबंदी, सदोष वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि अयशस्वी ठरलेली टाळेबंदी या कारणांनी उद्धवस्त झाल्याचे सांगत काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेसाठी देवाचे कृत्य असलेल्या कोरोना महमारी जबाबदार ठरल्यावरून गांधींनी ही टीका केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महामारीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे गुरुवारी म्हटले. हे कृत्य देवाचे असल्याचे (अॅक्ट ऑफ गॉड) असल्याचेही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटले होते. चालू आर्थिक वर्षात विकासदरात घसरण होणार असल्याचे सीतारामन यांनी मत व्यक्त केले. चालू वर्षात आपण असामान्य स्थितीला सामोरे जात आहोत. आपण देवाच्या कृतीला तोंड देत आहोत. कदाचित आपल्या अर्थव्यवस्थेत घसरण झाली असेल, असे सीतारामन यांनी म्हटले होते. यावर राहुल गांधींनी ट्विट करत म्हटले, भारतीय अर्थव्यवस्था तीन कृतीमुळे उद्धवस्त झाली आहे. १. नोटाबंदी. २ सदोष जीएसटी ३. अपयशी ठरलेली टाळेबंदी. गांधींनी ट्विटसोबत सीतारामन यांच्या विधानाच्या वृत्ताला टॅग केले आहे. त्यावर गांधींनी सर्व काही खोटे असल्याचे म्हटले आहे.

  • India’s economy has been destroyed by three actions:

    1. Demonetisation
    2. Flawed GST
    3. Failed lockdown

    Anything else is a lie.https://t.co/IOVPDAG2cv

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

निर्मला सीतारामन यांनी ४१ व्या जीएसटी परिषदेनंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांसी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यांना भारतीय रिझर्व्ह बँक अथवा बाजारातून कर्ज घेण्याचे दोन पर्याय दिले आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सातत्याने केंद्रातील मोदी सरकारला ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून निशाणा साधला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.